Published On : Sat, Mar 31st, 2018

BSNL ठेकेदार आत्महत्या प्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

Gavel, Court

Representational Pic

नागपूर: विद्यमान सत्रन्यायाधीश ए व्ही दीक्षीत यांनी आरोपी नामे ब्रजेश त्रिपाठी यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

प्रकरण असे की दि 23-2-2018 रोजी आनंद बावरिया नामक एका ठेकेदाराने BSNL च्या कर्मचाऱ्यांना आणि ब्रजेश त्रिपाठी यांना जबाबदार ठरवून विषप्राशन करून आत्महत्या केली.

मृतकाच्या भावाच्या फिर्यादी वरून पो.स्टे सीताबर्डी नागपूर येथे कलम 306 भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

BSNL ने मृतका चा ठेका रद्द करून तो अर्जदारास दिला यात अर्जदार काय करणार आणि जो काही पैशाचा वाद होता त्यासाठी मृतकाने कायदेशीर कारवाई करायला हवी होती, आत्महत्या हा त्याला पर्याय नव्हता. तसेच अर्जदाराने 3 लाख रू मृतका कडून घेऊन BSNL. अधिका-यांना दिले हा आरोप हास्यास्पद वाटतो असा युक्तिवाद अर्जदारातर्फे अॅड चंद्रशेखर जलतारे यांनी केला.

सरकारकडून एपीपी खापर्डे आणि फिर्यादी तर्फे अॅड देवेन्द्र चौहान यांनी सांगितले की प्रकरण फार गंभीर आहे तरी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात येऊ नये.

सर्व परीस्थिती चा सखोलपणे विचार करून विद्यमान कोर्टाने निकाल दिला की आरोपीची कोठडीत विचारपूस करण्याची गरज नाही आणि आरोपीस 30000/- चा सशर्त जामीन मंजूर केला.