२०० पॅरामेडिकल कर्मचाèयांना प्रशिक्षण
– क्वारंटाईनची सुविधा, सॅनिटायझेशन अन् सुरक्षा
नागपूर: जून, जुलै महिन्यात कोरोनोबाधित आणि संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. या पृष्ठभूमीवर राज्य शासनाच्या अखत्यारीत भवन राखीव ठेवले. यासोबतच रेल्वेलाही सज्ज ठेवण्याचे निर्देश होते. मध्य रेल्वे नागपूर विभागाने तातडीने ६० कोचमध्ये १५० क्वारंटाईन बेड तयार करून ते सज्ज ठेवले आहेत. संशयितांची संख्या वाढल्यास आणि जागा अपुरी पडल्यास संशयितांना रेल्वे डब्यातील बेडमध्ये ठेवले जाईल. मात्र अद्याप उपराजधानीत अशी वेळ आली नाही.
कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार शक्य ती उपाययोजना करीत आहे. बाधितांवर मेयो, मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर संशयितांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर शहरात आतापर्यंत गड्डीगोदाम, मोमीनपुरा, सतरंजीपुरा, टिमकी, ताजनगर, नाईक तलाव, बांगलादेश, भरतनगर, qझगाबाई टाकळी, मायानगर, मॉडेल टाऊन आदी परिसर सील करून तेथील संशयितांना आमदार निवास, रविभवन, व्हीएनआयटी, शेतकरी प्रशिक्षण संस्था, महाविद्यालय, पोलिस क्वार्टर आदी ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. काही परिसर प्रतिबंधमुक्तही करण्यात आले.
दरम्यान रेल्वेला निर्देश असल्याने नागपूर विभागाने ६० कोचमध्ये १५० क्वारंटाईन बेड तयार केलेत. संपूर्ण बेड सॅनिटाईझ करण्यात आले आहेत. नागपूर रेल्वेस्थानकावर असलेल्या या बोगीची सुरक्षा आरपीएफ जवान करीत आहेत. यासाठी २०० कर्मचारीही सज्ज ठेवण्यात आले आहेत.
यात डॉक्टर, परिचारिका, फार्मासिस्ट, कंपाऊंडर, सफाई कामगारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्या सर्वांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. आता संपूर्ण कर्मचारी आणि बोगी सज्ज आहे. मात्र, संशयितांसाठी जागा अपुरी पडत आहे, अशी स्थिती नागपुरात सध्या तरी नाही. जागा अुरी पडल्यास रेल्वेचे डबे तयार आहेत.