Published On : Fri, Aug 16th, 2019

तालुक्यात ब्राम्हणी ग्रामपंचायत ठरली ‘स्मार्ट’

नागपूर:- बुटी बोरी पासून १० की मी अंतरावरील तालुक्यातील ब्राह्मणी ग्रामपंचायत ने सण २०१८-१९ चा स्मार्ट ग्राम पुरस्कार पटकावून तालुक्यात सर्व ग्रामपंचायत मध्ये ठरली ‘स्मार्ट’!

ब्राम्हणी ग्रा प ने याच सोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा पुरस्कार पटकावून दि १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनी त्यांना हा पुरस्कार जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदान केला.

ब्राम्हणी ग्रामपंचायतीचे प्रामाणिक,कर्त्यव्यदक्ष व युवा ग्रामसेवक तुलसीदास भणारकर यांचे मार्गदर्शनात सरपंचा माधुरी घोडमारे यांनी सर्व ग्रा प सदस्य यांना सोबत घेऊन व ग्रामस्थांच्या सहकार्याने गत दोन वर्षात गावाला स्वच्छ व सुंदर करण्याकरिता गावात ग्राम स्वच्छता अभियान,वृक्षारोपण गावात मुबलक पाणीपुरवठा व्हावा म्हणून गावतळे,गावातील युवक व बालकांना वाचनाची सवय लागावी म्हणून सार्वजनिक वाचनालय,आदर्श ग्राम बनविण्याकरिता दारू,मटका सारखे अवैध धंदे करणाऱ्याचे सामाजिक उद्बोधन करून गावातील अवैध धंदे बंद केले.

गावात सामाजिक,धार्मिक व मैत्रीपूर्ण वातावरण निर्मिती करण्यासाठी विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या सभा लावून गाव आदर्श करण्याच्या प्रयत्नाला दि १५ ऑगस्टला मिळालेल्या स्मार्ट ग्राम पुरस्कारामुळे फलश्रुती आली असून जिल्हास्तरावर स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळविण्यासाठी ते प्रयत्नरत आहे.