Published On : Tue, Feb 4th, 2020

बोरी शाळेत आंनद मेळावा संपन्न

कन्हान : – पंचायत समिती पारशिवणी केंद्र कन्हान अंतर्गत उच्च प्राथमिक शाळा बोरी (सिंगोरी) येथे बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला. जि प उच्च प्राथमिक शाळा बोरी (सिंगोरी) येथे आयोजित बाल आंनद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी अनेक खाद्य पदा र्थ, फळे, पुस्तके यांचे दुकाने लावुन उत्तम विक्री केली.” हजारो रुपयांची खरेदी पालकांनी, विद्यार्थ्यांनी करून व्यवहारीक आणि व्यवसाय ज्ञान, शिक्ष णाचे विद्यार्थ्यांनी धडे आत्मसात केले.

असे मत गावचे सरपंच श्री सुभाष नाकडे यांनी व्यक्त केले. पालक आणि गावकऱ्यांनी ह्या मेळाव्याचा आनंद व लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेक रिता मुख्याध्यापक श्री शांताराम जळते, श्री बाबा बंड, अरविंद नंदेश्वर, टीकाराम कडूकर, श्रीमती अनिता दुबळे आदीसह ग्रामस्थानी सहकार्य केले.