– नरखेडमार्गे चालवा किसान रेल्वे,यंदा बंपर संत्रा उत्पादनाचे संकेत
नागपूर – कोरोनाच्या पृष्ठभूमीवर क जीवनसत्वाची भरपूर मात्रा असलेल्या संत्र्याला देश विदेशात विशेष पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशात प्रचंड मागणी आहे. यंदा बंपर संत्रा उत्पादनाचे संकेत आहेत. ही संत्रा उत्पादकाची जमेची बाजू आहे. अशा स्थितीत किसान रेल्वे संत्रा उत्पादकांसाठी वरदान ठरू शकते. वेळेवर संत्रा पोहोचविता यावा या दृष्टीने नरखेडमार्गे किसान रेल्वे चालविण्याची मागणी नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांकडून होऊ लागली आहे.
शेतकरीच माला लाही साथ दिली. त्यामुळे यंदा बंपर संत्रा उत्पादनाचे संकेत मिळत आहेत. पण, कोरोनामुळे वाहतुकीची साधने फारच मर्यादित असल्याने संत्रा उत्पादक चिंतातूर आहे, हाती आलेल्या पिकाला चांगला दर मिळेल की नाही ही चिंता त्यांना भेडसावत आहे.
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर क जीवनसत्व असलेल्या संत्र्याला यंदा मोठी मागणी असणार आहे. काही प्रामणात अंबिया बहाराचा संत्रा बाजारात विक्रीसाठीही उपलब्ध झाला आहे. पण, कोरोनाचा कहर सुरू असल्याने वाहतुकिची साधने गरजेपेक्षा फारच कमी आहे. हिच संत्रा उत्पादकांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. चविने आंबट असणाèया अंबिया बाहाराच्या संत्र्याला स्थानिक बाजारपेठेत फारशी मागणी नसते. पण, याच संत्र्याला कोलकातासह पश्चिम बंगाल व बांग्लादेशापर्यंत मागणी आहे. तिथे दरही चांगला मिळतो. अशा स्थितीत किसान रेल्वे संत्रा उत्पादकांसाठी वरदान ठरू शकते. या सेवेचा लाभ मिळाल्यास आंबट गोड चविचा दर्जेदार संत्राही देशाच्या विविध भागात पोहचविणे आणि त्यातून चांगले उत्पन्न पदरी पाडून घेणे संत्रा उत्पाकांसाठी शक्य होणार आहे. यामुळेच नरखेडमार्गे किसान रेल्वे चालविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
खासदार तुमानेंनीही रेटली मागणी
उपराजधानीतील संत्र्याची अन्य राज्यात वाहतूक तसेच विदेशात निर्यात करता यावी, यासाठी नागपूरहून किसान रेल्वे सुरू करावी, अशी मागणी खासदार कृपाल तुमाने यांनी मध्य रेल्वेकडे केली आहे. तुमाने यांच्या प्रयत्नामुळे मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकावर संत्रा उत्पादक शेतकèयांना विक्रीसाठी जागा उपलब्ध होणार आहे. सोबतच रेल्वेने किसान स्पेशल चालविल्यास संत्रा उत्पादकांचा माल वेळेत पोहचेल. त्यातून संत्रा उत्पादकांना नव्या संधीही येत्या काळात प्राप्त होतील, अशा विश्वास तुमाने यांनी व्यक्त केला.