Published On : Thu, Sep 10th, 2020

नागपूर फुटाळा तलाव येथे प्रस्तावित बुद्धिस्ट थीम पार्क प्रकल्पाचे सादरीकरण

Advertisement

मुंबई : नागपूर त्रिशताब्दी (1702-2002) महोत्सव अंतर्गत विकासासाठी घेतलेल्या जागतिक दर्जाच्या बुद्धिस्ट थीम पार्क प्रकल्पाचे सादरीकरण राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत व राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सह्याद्री गेस्ट हाऊस मलबार हिल मुंबई येथे आज करण्यात आले.

नागपूर येथील फुटाळा तलाव तेलंगखेडी येथे बौद्ध शिल्प उद्यानाचे प्रकल्प हे शताब्दी महोत्सव समितीच्या कार्यक्रमा अंतर्गत करण्यासाठी सन 2001 मध्ये तत्कालीन उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांच्याद्वारे पुढाकार घेण्यात आल्यानंतर या प्रकल्पाला तत्कालीन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवजीराव मोघे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मौजे फुटाळा येथे अंदाजे 112.57 हेक्टर जागेवर बौध्द शिल्प उद्यान करिता आरक्षित ठेवण्याचे ठरले होते.

Gold Rate
Mar 232026 - Time 10.20Hrs
Gold 24 KT ₹ 1,40,300 /-
Gold 22 KT ₹ 1,30,500 /-
Silver/Kg ₹ 2,16,800/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रस्तावित बुद्धीस्ट थीम पार्क प्रकल्पाला अंदाजे 1000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाकडे जगातील सर्व बुद्धिस्ट राष्ट्रे आकर्षित होणार असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देतील व यामुळे नागपूर हे पर्यटनाचे जागतिक केंद्र तयार होणार आहे.

सदर जागेची मालकी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्याकडे असून ती संपादित करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण द्वारे करण्याचे प्रस्तावित केले आहे.

प्रस्तावित बौद्ध शिल्प उद्यानाचे सादरीकरण प्रसिद्द वास्तुविशारद अशोक मोखा यांनी केले. जागतिक बँकेचे सल्लागार रवी बनकर, प्रधान सचिव पर्यटन वल्सा नायर सिंग, प्रधान सचिव पशुसंवर्धन व इतर अधिकारी उपस्थित होते

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement