Published On : Mon, Dec 10th, 2018

पिपरी घाटावर रेती चोरून नेताना बोलोरो पिकअप गाडी पकडली

कन्हान : – पारशिवनी तहसिलदार वरूण सहारे यांनी मध्यरात्री कन्हान नदीच्या पिपरी घाटावर धाड टाकुन रेती चोरून नेताना बोलोरो पिकअप गाडी पकडुन कन्हान पोलीस स्टेशनला गाडी चालक व मालका विरूध्द गुन्हा दाखल करून १लाख ७९०० रूपयांचा दंड ठोठावला .

शनिवार (९) च्या मध्यरात्री २ वाजता दरम्यान पारशिवनीचे तहसिलदार वरूण सहारे यांनी महसुल कर्मचा-यास कन्हाल नदीच्या पिपरी घाटावर धाड टाकुन बोलोरो पिकअप गाडी क्र एम एच ४० बी जी २७३९ मध्ये दीड बॉस रेती चोरून नेताना पकडली .

गाडी चालक व मजुर घटनास्थळावरून पसार झाले . बोलोरो पिकअप गाडी कन्हान पोलीस स्टेशनला जमा करून गाडी मालक आकाश महातो व चालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून १लाख ७९०० रूपयांचा दंड ठोठावला .

Advertisement

या कार्यवाहीत तहसिलदार वरूण सहारे व महसुल तलाठी श्रीरसागर, कोतवाल बंडू वानखेडे , चंद्रमणी वाहणे आदीने कामगिरी बजावली .

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement