Published On : Mon, Dec 10th, 2018

कन्हान नदीच्या किना-याची जमिन ढिवर बांधवाना उपजिविकेकरिता द्या

 

कन्हान : – ढिवर समाज सेवा संघटना कन्हान-पिपरी व्दारे कन्हान नदीच्या किणा-या लगत कित्येक वर्षापासुन ढिवर बांधव डांगर वाडी,भाजीपालाची शेती करून परिवाराचा उदनिर्वाह करित असल्याने ही जमिन ढिवर बांधवाना वायदा (टँक्स) लावुन किवा लिजवर देण्यात यावी . अशी मागणी मा तहसिलदार वरूण सहारे यांना निवेदन देऊन करण्यात आली .

कन्हान नदीच्या काठावरील जुनिकामठी, गाडेघाट, पिपरी , कन्हान, सिहोरा गावात ढिवर समाज मोठय़ा प्रमाणात राहत असुन पुर्वी नदीच्या मासेमारी करून परिवाराचे पालनपोषण करायचे परंतु कन्हान नदीचे पाणी धरणाने अडवुन नागपुर शहराला पिण्याकरिता जात असल्याने पाण्याची पातळी कमी झाल्याने मासेमारी संकटात आली . त्यामुळे कन्हान नदीच्या किना-यालगत ढिवर बांधव वडिलोपार्जित डांगर, टरबुज वाडया , भाजीपाल्याची शेती करून परिवारांचे पालनपोषण करित आहे .

यास्तव वाडया व भाजीपाला शेती वापरण्यात येणारी कन्हान नदीची जमिन वायदा घेऊन किवा लिजवर ढिवर बांधवाच्या नावावर करून देण्यात यावी.जेणे करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करून आपल्या परिवाराची प्रगती करतील. ढिवर समाज सेवा संघटना कन्हान-पिपरी व्दारे १० ऑक्टोबर २०१७ ला मा. उपविभागीय अधिकारी रामटेक यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती . यांची दखल घेत महसुल विभागाव्दारे मौका चौकसी व पाहणी करून अहवाल पारशिवनी तहसिल कार्यालयात सादर करण्यात आला होता .

Gold Rate
22 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,11,200 /-
Gold 22 KT ₹ 1,03,400 /-
Silver/Kg ₹ 1,33,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

एक वर्ष झाल्याने ढिवर समाज सेवा संघटना कन्हान-पिपरी व्दारे मा तहसिलदार वरूण सहारे यांना शिष्टमंडळ भेटुन चर्चा करून कन्हान नदीच्या किना-याची जमिन ढिवर बांधवाना उपजिविके करिता वायदा (टँक्स) लावुन किवा लिजवर लवकरात लवकर देण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली .

शिष्टमंडळात ढिवर समाज सेवा संघटना कन्हान-पिपरी चे अध्यक्ष सुतेश मारबते व युवा समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार, उज्वल येलमुले, कुंदन रामगुडे, श्रीकांत मानकर, मनोज मेश्राम, गितेश मोहणे, अजय मांढरे , संजय भोयर, रामचंद्र भोयर प्रामुख्याने उपस्थित होते .

Advertisement
Advertisement