
नागपूर : रामदासपेठ परिसरात मॅगी आधी देण्याच्या किरकोळ कारणावरून झालेला वाद हिंसक वळणावर पोहोचला. कुख्यात गुन्हेगार चंदू उर्फ चंद्रशेखर कावरे याने आपल्या साथीदारांसह दोन तरुणांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दोन युवक जखमी झाले असून सिताबर्डी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हसनबाग येथील २६ वर्षीय अब्दुल सिफान शेख हे आपल्या मित्रांसोबत रामदासपेठ येथील सोमलवार हायस्कूलसमोरील मॅगीच्या ठेल्यावर गेले होते. त्याचवेळी चंदू उर्फ चंद्रशेखर कावरे हा आपल्या साथीदारांसह तेथे आला. मॅगी आधी कोणाला द्यायची यावरून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला.
काही क्षणांतच हा वाद हाणामारीत बदलला. चंदू कावरे आणि त्याच्या तीन ते चार साथीदारांनी अब्दुल सिफान शेख व त्यांचा मित्र वृषभ यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्लेखोरांनी हात-मुक्क्यांसह दगड आणि धारदार वस्तूंचा वापर केल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
घटनेची माहिती मिळताच सिताबर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिसांना पाहताच आरोपी तेथून पसार झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पीडितांच्या तक्रारीवरून सिताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. चंदू उर्फ चंद्रशेखर कावरे हा अजनी परिसरातील कुख्यात गुन्हेगार असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी मकोका आणि एमपीडीएसारख्या कठोर कायद्यांअंतर्गत कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे.
nagpur student protest delhi lathi charge
प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...
चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery
लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...
कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...
नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime #CCTV #LatestNews...




