नागपूर :प्रेमसंबंधाच्या केवळ संशयातून शेजाऱ्यांनी एका महिलेवर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या सक्करदरा परिसरात घडली. गंभीर जखमी झालेल्या आईला वाचवण्यासाठी धावलेल्या २० वर्षीय मुलीलाही आरोपींनी बेदम मारहाण केली. यानंतर घरात घुसून तोडफोड करत संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत आरोपी फरार झाले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती खासगी कंपनीत कार्यरत असून ती स्वतः घरी झुंबा क्लास चालवते. शेजारी राहणाऱ्या महिलेच्या मनात तिच्या पतीचे आणि पीडितेचे कथित प्रेमसंबंध असल्याचा संशय निर्माण झाला होता. याच संशयातून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरू होता.
२७ जून रोजी सकाळी सुमारे ८ वाजता मनीषा आणि सुषमा खुरपुडे यांनी पीडित महिलेशी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी गजानन खुरपुडे याने लोखंडी गज उचलून महिलेच्या खांद्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली.
आईच्या आरडाओरड्यानंतर मदतीसाठी धावलेल्या २० वर्षीय मुलीलाही आरोपींनी मारहाण केली. तिच्या पोटात लाथा मारल्याचा आरोप असून, त्यानंतर आरोपींनी घराच्या खिडक्यांच्या काचा फोडून तोडफोड केली. जाताना संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत ते घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेनंतर पीडित महिलेने डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. उपचारानंतर सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार गजानन खुरपुडे (३५), मनीषा गजानन खुरपुडे (३२) आणि सुषमा रोशन खुरपुडे (२८) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
गोदाम का दरवाजा तोड़कर डेढ़ लाख का वायर साफ #nagpurnews #nagpur #crimenews
गर्भपात और कामोत्तेजक दवाइयों की बिना लाइसेंस बिक्री का आरोप #nagpurnews #news
25 हजार रुपए की रिश्वत लेते भूमापक रंगेहाथ गिरफ्तार #vidarbhanews #nagpur #newsupdate...
त्योहारों को लेकर अकोला प्रशासन अलर्ट, तैयारी तेज #vidarbhanews #akola #newsupdate #vidarbha...
बावनकुले ने छात्रों संग थामा तिरंगा, निकाली रैली #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha
किसानों के जमीन अधिकारों पर सरकार का बड़ा फैसला #maharashtranews #pune #newsupdate...





