Published On : Mon, Sep 9th, 2019

पावसाच्या कहराने डौलदार पिकांचे अतोनात नुकसान 280 हेक्टर जमिनीतील पिके नष्ट

Advertisement

कामठी :- कामठी तालुक्यात मागिल तीन दिवसांपासून संततधार मुसळधार पावसाचा कहर आहे.धानपिकासाठी संततधार पाऊस चांगला असला तरी इतर पिकासाठी धोकादायक ठरला आहे.तर 280 हेक्टर जमिनीतील पिके नष्ट झाले आहेत.तसेच या प्रकारचा मुसळधार पाऊस पडल्याने सर्व नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने नदी, तलाव, नाल्या काठावरील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळण्याच्या मागणीसाठी पूरग्रस्तांना तहसीलदार अरविंद हिंगे यांना निवेदन दिले आहेत.

कामठी तालुक्यात 130 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद असून तालुक्यातील आडका, केम, पडसाड, चिखली, भुगाव, नेरी, गादा, टेमसना परिसरातील अनेक नदी-नाल्यांना पूर येऊन नाल्या काठावरील सोयाबीन धान तूर कापूस पराटी चे पिके खडून लोटून गेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत तालुक्यातील कोराडी मंडळांतर्गत 09 घरे वडोदा मंडळ 48 ,कामठी मंडळ 60, दिघोरी मंडळी 51 एकूण 168 नागरिकांच्या घरांच्या भिंती पडून मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे सोबतच कामठी शहरातील सैलाब नगर ,विक्तू बाबा नगर ,समतानगर कामगार नगर ,रमा नगर परिसरातील नाल्या काठावरील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरून त्यांचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहेत.

जाखेगाव येथील जितेंद्र रामदास मानकर यांच्या मालकीचे कुकुट पालन केंद्र असून या कुक्कुटपालन केंद्रात साडेचार हजार कोंबड्या होत्या कुकुट पालन केंद्र पुराचे पाणी शिरल्याने साडेचार हजार कोंबड्या पुरात वाहून गेल्याआहेत त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तसेच शहरातील प्रभाग क्र 15 येथील पूरग्रस्तांना त् आर्थिक मदत मिळण्याच्या मागणीसाठी नगरसेवक नीरज लोणारे तसेच नगरसेविका संध्या रायबोले यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन पूरग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी केली तर प्रभाग क्र 14 मध्ये रोहन दिनेश बिल्लरवान यांच्या नेतृत्वात पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळावी यासाठी निवेदन सादर करण्यात आले.

तहसीलदार अरविंद हिंगे यांनी सर्व पूरग्रस्त ठिकाणचा पंचनामा करून तलाठी मंडळ अधिकारी ग्राम विकास अधिकारी अहवाल सादर केल्यावर शासनाकडून आर्थिक मदत देणार असल्याचे आश्वासन दिले.तसेच प्रभारी तालुका कृषी अधिकारी रिना डोंगरे यांच्या मार्गदर्शनार्थ संबंधित कृषी अधिकारी गावागावातून नुकसानग्रस्त पीक पाहणीत व्यस्त असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळविण्यासाठी अहवाल तयार करीत आहेत.

संदीप कांबळे कामठी