Published On : Tue, Oct 24th, 2017

‘ गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रात रक्तदान व आरोग्य शिबिर ’

Advertisement

नागपूर: सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्र आणि डागा स्मृती शासकीय रुग्णालयातर्फे दाभा नागपूर येथे डाॅ. अतुल कल्लावार यांच्या जयंतीनिमित्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डागा स्मृती शासकीय रुग्णालयाचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. तराम व चमूने मार्गदर्शन केले. शिबिरात २६ रक्तदात्यानी रक्तदान केले.

डाॅ. अतुल कल्लावार यांच्या जीवनावर संस्थेचे विश्वस्त श्री. नारायण समर्थ यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. अनिल आदमने होते, त्यांनी डॉ. कल्लावार यांच्या समाजकार्याविषयी व जीवनचरित्रविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डाॅ. राजेश नाईक होते.

संस्थेच्या समुपदेशन संचालक डाॅ. शर्मिष्ठा गुप्ता यांनी पाहुण्याचे आभार मानले, सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रातर्फे डाॅ. शिवराज देशमुख यांनी रक्तदान व आरोग्य शिबीर कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाॅ. संजिव सारडे, विनीत हिरडकर, सतीश कडू, मनोज घवघवें, उर्वशी गायगोले, शुभांगी महाजन, मयूर झाडे आदींनी परिश्रम घेतले.