Published On : Fri, Apr 2nd, 2021

न्यायिक मागण्यासाठी कामठी नगर परिषद कर्मचाऱ्यांचे काळी फित आंदोलन

कामठी :-कामठी नगर परिषद चे सफाई कामगार, पाणीपुरवठा कामगार तसेच सर्व कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दोन दोन महिने वेतन मिळत नसल्याने कर्माचाऱ्यावर होत असलेल्या उपसमारीस कंटाळून तसेच इतर प्रलंबित मागण्यासंदर्भात शासनाचे होणारे दुर्लक्ष व डी एम ए कार्यालयाकडून होत असलेल्या विनाकारण त्रासामुळे कर्मचाऱ्यांच्या न्यायिक हक्काच्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी आज 1 एप्रिल ला कामठी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी काळी फीत बांधून निषेध नोंदविण्यात आला तसेच 15 एप्रिल ला एक दिवसीय लेखनिबंद आंदोलन तसेच 1 मे ला कामगार दिना च्या दिवशी अत्यावश्यक सेवे सह बेमुद्दत काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे.

आजच्या या एक दिवसीय काळी फीत आंदोलनात संघटनेचे कार्याध्यक्ष विजय मेथीयां, सचिव प्रदीप जैस्वाल तसेच रुपेश जैस्वाल, विजय सूर्यवंशी, विनोद मेहरोलिया, संजय जैस्वाल, दर्शन गोंडाने, पुंडलीक राऊत, मसूद अख्तर, माधुरी घोडेस्वार, रणजित माटे , आशिष राऊत, नरेश कलसे, आदि कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी