कन्हान : – विभागीय क्रीडा संकुल, मानकापुर, नागपूर येथे संपन्न झालेल्या विद्या भारती प्रांत स्तरीय आंतरशालेय
अँथलेटिक्स स्पर्धेत बीकेसीपी शाळेच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करीत १४ व १७ वर्षे वयोगटात मुला मुलींनी यश संपादन केले .
विभागीय क्रीडा संकुल मानकापुर, नागपूर येथे संपन्न झालेल्या विद्या भारती प्रांत स्तरीय आंतरशालेय अँथलेटिक्स स्पर्धेत पारशिवनी तालुक्यातील बीकेसी पी शाळा कन्हानच्या खेळाडूंनी १७ वर्ष आत मुलींमध्ये १०० मी.धावने व लांब उडी मध्ये सानिका मंगर प्रथम क्रमांक पटकावित पश्चिम क्षेत्रा करिता प्रवेश निश्चित करित विद्या भारती विदर्भाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
वयोगट १७ वर्ष मुलान मध्ये वैभव सिंग ५००० मी. चालणे यात तृतीय स्थान मिळविला. हिमांगी नाटकरने हॅमर थ्रो मध्ये सुवर्ण, भुमिका भोसकरने ८०० मीटर धावण्यात रौप्य पदक व प्रिन्सी गुप्ताने सिल्वर तर उदय मस्के यांने ८० मीटर हरदल मध्ये सिल्वर मेडल जिंकले. १४ वर्ष वयोगटात मुलां मध्ये लांब उडी स्पर्धेत शिवांश तिवारीने तृतीय क्रमांक मिळवित शाळेच्या खेळाडूंनी उल्लेखनीय मुला, मुलींनी यश संपादन केले .
शाळेचे क्रिडा शिक्षक अमित ठाकुर यांचे मार्गदर्शनात नियमीत सराव करीत असुन विद्या भारती प्रांत स्तरीय शालेय एथलेटिक्स स्पर्धेत पारशिवनी तालुक्या तील बीकेसीपी शाळेच्या खेडाळुनी प्रतिनिधीत्व करित संपादन केल्याने या यशाचे श्रेय खेडाळुनी क्रिडा शिक्षक अमित ठाकुर हयाना दिले. तालुक्याचे व शाळेचे नावलौकिक केल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष राजीव खंडेलवाल, सचिव गेरोला मॅडम, मुख्याध्यापीका कविता नाथ, क्रिडा शिक्षक अमित ठाकुर व सर्व शिक्षकांनी खेडाळुचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
