भाजपाची विजय संकल्प सभा रामटेक विधानसभा क्षेत्रात संपन्न

रामटेक: रामटेक विधानसभा क्षेत्रात विधानसभा निवडणुक-2019 मध्ये भारतीय जनता पार्टीला विजय प्राप्त करून देण्याकरिता बुधवार ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी रामटेक विधानसभा क्षेत्र यांचे उपस्थितीत विजय संकल्प बैठक व सभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी रामटेक विधानसभा क्षेत्रातील पातीमाता देवस्थान,पारशिवनी, आनंद मंगल कार्यालय,आमडी ग्रामपंचायत पटांगण,नगरधन किराड भवन,रामटेक भाजप शिक्षक आघाडी, रामटेक वावआंबेडकर चौक, कन्हान इत्यादी ठिकाणी घेण्यात आली त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व बुथ प्रमुख, पेज प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, सर्व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे नियोजित स्थळी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाकरीता तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर ढोक , जयराम मेहरकुळे,उमेश पटले, आनंद रामेलवर,रजत गजभिये ,सागर सायरे,विलास मेश्राम , इत्यादी प्रभारी यांनी विधानसभेतील संपुर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात परिश्रम घेतले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement