Published On : Thu, Sep 26th, 2019

रामटेक तालुक्यात दारूभट्टी वर धाडीचे सत्र सुरू .

रामटेक (शहर प्रतिनिधी)पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत नुकतेच उपविभागीय पोलीस अधिकारी नयन अलूरकर व पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे , पोलीस हवालदार मनोहर राऊत, पोलीस हवालदार महेश नुरिया, पोलीस शिपाई चौधरी, चाचेरे, सपाटे यांनी केली. पो स्टे रामटेक अप,क्र -673/19 कलम 65 ई मु.दा,का नगरधन येथील शोभा संतोष थारडे (वय 34 वर्ष)यांचे कडून 05 लि. मोहाफुल दारु किमती 500/-, पो स्टे रामटेक अप,क्र* -674/19 कलम 65 ई मु.दा,का साटक येथील कांशीराम रामजी चेतकर राहणार यांचे कडून 3 लि, मोहाफुल दारु किमत 3,300/-चा माल जप्त केला.पो स्टे रामटेक अप,क्र- 675/19 कलम 65 ई मु.दा,का भांडारबोडी येथील नामदेव वारलू तरारे( वय 70 वर्ष ) 05 लि, मोहाफुल दारु किमती 500/- चा माल जप्त केला. ही कारवाई सतत सुरू राहणार असल्याचे उपविभागीय अधिकारी नयन आलूरकर यांनी सांगीतले