Published On : Fri, Jun 2nd, 2023

भाजपची रणनीती ; महराष्ट्रात विजयासाठी वापरणार ‘माधव’ फॉर्म्युला

– आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. लोकसभेसाठी ‘मिशन ४८’ तर विधानसभेसाठी ‘२०० प्लस’ची भाजपने हाती घेतली आहे. यातच शिंदे गट आणि भाजप सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने मोट बांधली आहे. याकरिता भाजपकडून विजयासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली. यातच विधानसभेच्या २०२४ मध्ये होत असलेल्या निवडणुकांतील विजयासाठी भाजप ८० च्या दशकातील जुनाच फॉर्म्युला वापरणार असल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपने १९८० च्या दशकापासूनच ‘माधव’ फॉर्म्युला स्वीकारला होता. याच धर्तीवर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी माळी, धनगर आणि वंजारी समाजाला एकत्र करण्यासाठी ही रणनीती तयार केली होती. त्यादरम्यान याचा भाजपाला मोठा फायदाही झाला होता.

Advertisement

भाजप हा पक्ष त्याच्या सुरुवातीच्या काळात केवळ एकाच विशिष्ट जातिपुर्ती मर्यादित होता. याचाच भाग म्हणून वसंतराव भागवत यांनीच ‘माधव’ फॉर्म्युला आणला. त्यात गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकर आणि महादेव शिवणकर यांच्यासह इतर नेत्यांनी मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढलेल्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले होते. महाराष्ट्रातही भाजपने चांगलं यश मिळवत थेट १२२ जागा मिळवल्या होत्या. यात मुंडेंनी वापरलेल्या ‘माधव’ ने निर्णायक भूमिका बजावली होती. मात्र काळानुसार भाजपचे या फॉर्म्युल्याकडे दुर्लक्ष होत गेल्याची चर्चा होती.

Advertisement
Advertisement
Advertisement