Published On : Thu, Jun 17th, 2021

शेतकऱ्यांच्या हितार्थ असलेल्या विविध न्यायिक मागण्यासंदर्भात भाजप चे निवेदन

Advertisement

कामठी :-शेतकऱ्यांच्या हितार्थ असलेल्या विविध न्यायिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी भाजप चे पदाधिकारी अनिल निधान यांच्या नेतृत्वात आज कामठी तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.

या मागण्यात सन 2019 -20मध्ये महाराष्ट्र शासनाने खरेदी केलेल्या धानाचे प्रति क्विंटल 700 रुपये बोनस तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करणे, सद्यस्थितीत असलेल्या रासायनिक खतांचा तुटवडा दूर करून शेतकऱ्यांना अविलंब खतांचा पुरवठा करने, शेतकरी कर्जमाफी झाल्यानंतरही शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देत नसलेल्या बँकेवर तात्काळ कारवाही करून नवीन पिक कर्ज देण्याचे निर्देश देणे,2019-20 मधील पीक विमा हफ्ता शेतकऱ्यांना मिळणेबाबत, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण पूर्ववत ठेवणे अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.

सन 2019-20मध्ये महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांकडून हमी भावाने धान खरेदी करून प्रति क्विंटल 700 रुपये बोनस जाहीर केलेला होता त्यानुसार कामठी तालुक्यातील असंख्य शेतकऱयांनी धान खरेदी केंद्रावर जाऊन धान विकले , धान विकून आज सहा महिन्याचा कालावधी लोटत चालला तरीसुद्धा अजूनपावेतो शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति क्विंटल 700 रुपये बोनस वर्ग झाले नाही. नुकताच शेतकरी राजा कोरोनाच्या संकटाला सोबतीला घेऊन एका नव्या उमेदीने शेतीकामाला गती देऊन सोयाबीन , धान, कापूस, पेरण्याच्या कामाला सुरुवात केले मात्र शेतकऱ्याला त्याच्या मालाचे हक्काचे पैसे न दिल्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.तालुक्यात कृत्रिम खतांचा तुटवडा निर्माण झाला असून नाईलाजास्तव शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा भावाने खते खरेदी करावे लागत आहेत .

हात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना व इतर योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली त्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यास बँक टाळाटाळ करीत आहे त्यामुळे ऐन शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना बँकांचे हेलपाटे खावे लागत आहेत.तसेच 2019-20मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला व जे शेतकरी पीक विमा योजनेत पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मोबदला मिळाला नाही , स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत ओबीसी वर्गाचे आरक्षण रद्द करण्यात आल्याने ओबीसी वर्गात मोठा असंतोष पसरला आहे तेव्हा ओबीसी वर्गाची लोकसंख्या लक्षात घेवुन आरक्षण पूर्ववत करावे तसेच उपरोक्त नमूद मागण्यांची त्वरित पूर्तता करावी ह्या मागण्या पूर्ण न झाल्यास भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी जी प सदस्य व भाजप चे पदाधिकारी अनिल निधान यांच्या नेतृत्वात दिलेल्या सामूहिक निवेदनातुन दिले आहे.

याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष किशोर बेले,कामठी पंचायत समिती सभापती उमेश रडके, येरखेडा ग्रा प सरपंच मंगला कारेमोरे, आशिष वंजारी, मनीष मेश्राम, सरिता भोयर, गोलू वानखेडे, विशाल चामट, सुभाष साखरकर, प्रमोद ढोबळे, राजश्री धिवले, गोपाल सीरिया, उन्मेष महल्ले आदी उपस्थित होते.