Published On : Wed, Mar 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

राज्यसभेसाठी भाजपचा मास्टरस्ट्रोक; नागपूरसह महाराष्ट्रातून चार दिग्गज मैदानात

Advertisement

नागपूर -आगामी राज्यसभा द्विवार्षिक निवडणूक 2026 साठी भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातून चार प्रमुख नेत्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. नवी दिल्लीतील पक्षाच्या केंद्रीय कार्यालयातून 4 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या पत्रकात या नावांना केंद्रीय निवडणूक समितीची मंजुरी देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातून जाहीर करण्यात आलेली उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे—
रामदास आठवले – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
विनोद तावडे – भाजपा राष्ट्रीय महासचिव
माया चिंतामण इवनाते – नागपूरच्या सक्रिय नेत्या
रामराव वडकुते

Gold Rate
Mar 2nd, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,67,000/-
Gold 22 KT ₹ 1,55,300/-
Silver/Kg ₹ 2,87,200 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान रामदास आठवले आणि विनोद तावडे यांसारख्या अनुभवी नेत्यांबरोबरच मायाताई इवनाते यांना संधी देत भाजपने सामाजिक व प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. विशेषतः विदर्भातून नाव समाविष्ट झाल्याने स्थानिक पातळीवर उत्सुकता वाढली आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी दिवसांत या निवडणुकीचे राजकीय परिणाम काय होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement