Published On : Tue, May 24th, 2022

भाजपचा ‘डीएनए’च ओबीसी! फडणवीस ठाकरे सरकारवर बरसले

Advertisement

महाविकास आघाडी सरकारमुळेच ओबीसी आरक्षण गेल्याची टीका करत त्यांनी कार्यकर्त्यांना आता थेट उत्तर देण्याचे आवाहन केलं आहे. मुंबई : ओबीसी आरक्षणासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पुन्हा एकदा एल्गार पुकारला. महाविकास आघाडी सरकारमुळेच ओबीसी आरक्षण गेल्याची टीका करत त्यांनी कार्यकर्त्यांना आता थेट उत्तर देण्याचे आवाहन केलं आहे. भाजपचा ‘डीएनए’चं ओबीसी आहे. ओबीसी हा भाजपचा श्वास आहे, असं म्हणत त्यांनी भाजपमुळेच आरक्षण गेलं अशी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं.

भाजप प्रदेश कार्यसमितीची बैठक मंगळवारी मुंबईत झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयाने आठवेळा तारखा घेतल्या. पण सरकारनं केवळ टाईमपास केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण स्थगित केलं. त्यानंतरही हे इम्पिरिकल डेटा तयार करू शकले नाहीत.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement