नागपूर: रविवारी १ जुलै रोजी सकाळी ९ वाजता भाजपच्या लाभार्थ्यांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मागील चार वर्षात दक्षिण नागपूर भाजपच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या भाजपच्या लाभार्थ्यांसाठी गजानन सभागृह, तपस्या शाळा रोड, अमरनगर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दक्षिण नागपूर भाजपचे अध्यक्ष संजय ठाकरे यांनी पत्रपरिषदेत दिली.
रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेकर बावनकुळे, मुख्य अतिथी म्हणून महापौर नंदा जिचकार, आ. सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, या. नागो गाणार, या.
अनिल सोले, या. गिरीश व्यास, आ. कृष्ण खोपडे, आ. विकास कुंभारे व आ. डॉ. मिलिंद माने उपस्थित राहणार आहेत. शनिवारी म्हणजेच आज ३० जून रोजी दक्षिण नागपुरातील ४३ मनपा व खासगी शाळेतील गरीब व गरजू विद्यार्त्यांना २० हजार नोटबुकांचे वाटप दक्षिण नागपुरातील नगरसेवक, नगरसेविका, प्रभाग अध्यक्ष व पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तसेच काही निवडक शाळांमध्ये आमदार विद्यार्त्यांना नोटबुक वाटप करणार आहेत. अशीही माहिती भाजपचे अध्यक्ष संजय ठाकरे यांनी पत्रपरिषदेत दिली.