Published On : Sat, Jun 30th, 2018

राज ठाकरे यांचा पक्ष संपला रामदास कदम यांची टीका

मुंबई : पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात राज्यातील प्लास्टिकबंदीच्या मुद्यावरून चांगलीच शाब्दिक रंगारंग सुरु आहे.राज ठाकरे यांचा पक्ष संपला असून त्यांनी व्यापाऱ्यांकडून सुपारी घेऊन ते शिवसेनेची बदनामी करित असल्याची टीका रामदास कदम यांनी केली आहे.

मुंबईतील घाटकोपर येथील असल्फा विभागात शिवसेनेतर्फे कापडी पिशव्यांच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रामदास कदम यांनी राज ठाकरेंवर चांगलेच तोंडसुख घेतले.

राज ठाकरे हे काळ्या मांजरासारखे निर्णयाला आडवे येत आहेत. संपूर्ण जगणे प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर ही, सबंध जग नालायक आहे आणि मी फक्त एकटा लायक आहे, असे म्हणून चालणार नाही. प्लास्टिक बंदी आवश्यक बाब आहे त्याचे स्वागत करायला हवे, अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा होती.” असे ही ते म्हणाले