Published On : Sun, Nov 24th, 2019

रामटेक मध्ये भाजपचा विजयी जल्लोष

फटाके फोडून ,मिठाई वाटून ,आतिषबाजी करून केला आनंद द्विगुणित

रामटेक : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व सरकार बनल्याची आनंदाची वार्ता ऐकू येताच भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्थानिक किराड भवन कार्यालया समोर मिठाई वाटून फटाक्यांची अतिष बाजी करून विजयी जल्लोष केला। ह्यावेळी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, नगराध्यक्ष दिलीप देशमुख , संजय मूलमुले,ज्ञानेश्वर ढोक, आनंदराव चोपकर, नरेंद्र बंधाटे,राहुल किरपान ,आनंद रामेलवार,नगरसेवक अलोक मानकर,प्रभाकर खेडकर, विवेक तोतडे, संजय बिसमोगरे,नगरसेविका कविता मूलमुले, लता कामडे,चित्रा धुरई,वनमाला चौरागडे,उमेश पटले,विनायक बांते,हुसेन मालाधारी, उमेश रणदिवे,रजत गजभिये, स्वप्नील खोडे, चंद्रमनी धमगाये,करीम मालाधारी ,सतीश दुणेदार,आदी चाहत्यांनी गुलाल उधळून विजयाचा आनंद द्विगुणित केला।