Published On : Sun, Nov 24th, 2019

शहीद गोवारी बांधवांना भाजपतर्फे आदरांजली अर्पण

नागपूर : हक्काच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चावर करण्यात आलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या गोवारी बांधवांना नागपूर शहर भारतीय जनता पक्षातर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली. शहर भाजप अध्यक्ष प्रवीण दटके यांनी झिरो माॅईल येथील गोवारी स्मारकाला शनिवारी (ता.23) पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विधी समिती सभापती व अनुसुचित मोर्चाचे अध्यक्ष धर्मपाल मेश्राम, शेखर येटी प्रामुख्याने उपस्थित होते.

गोवारी समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी 23 नोव्हेंबर 1994 रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता. या दरम्यान झालेला गोळीबार व चेंगराचेंगरीत 114 गोवारी बांधव शहीद झाले. शहीद गोवारी बांधवांच्या स्मरणार्थ झिरो माॅईल येथे गोवारी स्मारक तयार करण्यात आले आहे.

Gold Rate
28 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,21,000 /-
Gold 22 KT ₹ 1,12,500 /-
Silver/Kg ₹ 1,46,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भाजपतर्फे स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करतेवेळी भाजपचे अनुसुचित जमाती मोर्चाचे प्रकाश धुर्वे, रवी पेंदाम, स्वप्नील मसराम, अरविंद गेडाम, श्याम धुर्वे, मोनू धुर्वे, गीता उईके, दिनेश वाडीवे, गणेश मेश्राम, गोवारी स्मारक समितीचे अध्यक्ष शालीक नेवारे आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement