Published On : Mon, Nov 23rd, 2020

भाजयुमोने खेळली वीजबीलांची होळी!

भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगराद्वारे आज १० नंबर पुलिया जवळ वाढीव विजबील विरोधात वीजबिले जाळुन तिव्र आंदोलन करण्यात आले. आधीच कोरोना माहामारीमुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक झळ सोसावी लागत आहे. त्यातच खोटे विधाने आणि घोषणा करून महाआघाडी सरकार तर्फे जनतेची दिशाभुल करून विश्वासघात या रावणरूपी सरकार तर्फे होतांना दिसतो आहे.

वीजबीला संदर्भात रोज नव-नवीन विधाने करणार्या गोंधळलेल्या सरकार विरोधात व उर्जा मंत्र्यांनविरोधात आजचे आंदोलन करण्यात आले. या नंतर जर वीजबिले कमी झाली नाहीत तर अधिक तीव्र स्वरूपात भाजयुमो आंदोलन करेल असा इशारा या वेळी देण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांनी केले.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी प्रामुख्याने आमदार गिरीश व्यास, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, भाजपा उत्तर नागपुर अध्यक्ष संजय चौधरी, प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य राहुल खंगार, मंडळ अध्यक्ष सचिन करारे, कमलेश पांडे, सचिन सावरकर, जय साजवानी, बबलु बक्सारीया, पुश्करशेखर कुर्यवंशी, यश सातपुते, अमित पांडे, आशिष मेहर, अमित मिश्रा, रवी ठाकुर, जय साजवानी, अक्षय यादव, सलमान भाई, सुधीर यादव, ओमप्रकाश यादव, लखन यादव, आकाश दाभरे, दिपक विषेश, आदित्य बाजपई, करन पांडे, मोहीत रामटेके, राकेश भोयर, अमेय विश्वरूप, मनमीत पिल्लारे, अशुतोश भगत, अक्षय दाणी,रितेश रहाटे, सनी राऊत, आशिष मेहर, गुड्डू पांडे, अन्नू यादव, एजाज शेख, राहूल यादव, रोहित त्रिवेदी, राहूल पराते, मंगेश धर्मिक, शैलेश नेताम, गोविंदा काटेकर, नितेश ढगे, हर्षल वाडेकर, राहूल भागवत, अभिषेक पत्रक, अभिषेक , विकस रहांगडाले, अतुल कावळे, रितेश राठे, अथर्व त्रिवेदी बादल राऊत पवन खंडेलवार तुषार जवंजल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement