Published On : Mon, Nov 23rd, 2020

लोहमार्गाची मजबुती म्हणजे रेल्वेचा श्वास

Advertisement

नागपूर: मजबुत पायव्यावर पहाडासारखी भक्कम इमारत उभी राहते. त्याचप्रमाणे लोहमार्ग मजबुत असले की रेल्वे गाडी सुरक्षित धावते… कितीही वादळे आली तरीसुद्धा. त्यामुळे रेल्वेचा पाया समजल्या जाणाèया रुळाला भक्कम करण्यासाठी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रिचा खरे प्रयत्नशील आहे. रेल्वे रुळाला ठिकठिकाणी सांधे (जॉइंट) असले की, धोका वाढतो. त्यामुळे नागपूर विभागाने सलग २६० मीटरचे रेल्वे रूळ तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला. वरोèयात सुरू झालेल्या वेल्डिंग प्लँटमधून आतापर्यंत १०० किमीचा सलग रूळ तयार केला आहे. मध्य रेल्वेत हा पहिलाच प्रकल्प असून सलग रूळांमुळे संभाव्य धोका टाळला जाऊन रेल्वे सुरक्षित धावते. भारतीय रेल्वे आणि नागपूरकरांसाठी ही गौरवाची बाब आहे.

भारतीयांची जीवन वाहिनी समजल्या जाणाèया रेल्वेला सुरक्षित चालविण्यासाठी मजबुत रूळांची गरज असते. हीच बाब लक्षात घेता अलिकडेच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील वरोèयात एक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पात १३-१३ मीटरच्या छोट्या- छोट्या रुळांना जोडून २६० मीटरचा सलग रूळ तयार करण्याचे काम सुरू आहे. भिलाई स्टील प्लँट येथे रेल्वे रूळ तयार केले जातात. मात्र, हे लोहमार्ग छोटे म्हणजे १३-१३ मीटरचे असतात. त्या रुळांना जोडून रेल्वे मार्ग तयार केला जातो. लांबीने कमी असलेल्या रूळाला ठिकठिकाणी जोड (ज्वॉइंट) करावे लागते. जोड आला की धोका संभवतो. आतापर्यंत १०० किमी रूळ तयार करण्यात आले आहेत. सुरक्षित रेल्वेसाठी हा प्रकल्प वरदान ठरत आहे.

वाहतुकीच्या घनतेवर लोहमार्गाची क्षमता असते तर क्षमतेवर रुळाचे आयुष्य. ८०० ग्रॉस मेट्रिक टन (जीएमटी) म्हणजे सरासरी रुळांचे आयुष्य १० ते १२ वर्षांचे असते. दर वर्षाला ६० ते ७० किमी रूळ बदलविण्यात येतात. यंदा म्हणजे २०२० मध्ये ऑक्टोबरपर्यंत ११० किमी रूळ बदलविण्यात आले आहेत.

२६० मीटरचा सलग रूळ
स्वप्नाच्या दिशेने घेऊन जाणारी गुडनाईट एक्स्प्रेस डोळ्यांच्या पापणीच्या फलाटावर येताच प्रवाशांनी साखरझोपेत सुंदर स्वप्नात रंगून जावे. अशा सुंदर प्रवासाची अनुभूती देणारा सुरक्षित प्रवासात मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ अभियंता पवन पाटील (समन्वय) यांची महत्त्वाची भूमिका आहे. पाटील यांच्या कल्पकतेमुळे २६० मीटरचा सलग रूळ तयार होत आहेत. याशिवाय येथील डायमंड क्रॉqसगचे रूळ बदलविण्याचे जिकरीचे काम त्यांच्या नेतृत्वात पूर्ण करण्यात आले. मूळ नागपूरचे असलेले पाटील यांनी व्हीएनआयटीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी आसाम, लंम्डींग विभागातील हाफलाँग येथे काम केले.

त्यानंतर त्याच परिसरात दुसèया नियुक्तीदरम्यान गुवाहाटी ते सिलचना जोडणारा लोहमार्ग तयार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. मध्य रेल्वे भुसावळाला पाच वर्ष होते. मध्य रेल्वे नागपूर विभागात त्यांच्या नेतृत्वात बरीच महत्त्वपूर्ण कामे होत आहेत. अहोरात्र परिश्रम करून अपघाताची शक्यता असलेल्या ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे नियमित केली जात आहेत. रेल्वेच्या रूळांप्रमाणे आयुष्य गुंतलेले असते. मार्ग बरेच असले तरी कळत नाही कुठला मार्ग निवडावा. मात्र, असंख्य लोहमार्ग असतानाही त्यातून अचुक मार्ग निवडण्याची क्षमता पाटील यांच्यात आहे.