Published On : Sun, Nov 26th, 2017

भाजपचे खा. नाना पटोले यांचा भाजपा सरकारला घरचाच अहेर..!

Nana Patole in Amaravati
अमरावती: भंडारा गोंदिया चे भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले हे शहरात एका कार्यक्रमाकरीता आले असता त्यांनी शासकीय विश्राम भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आपल्याच भाजपा सरकारवर कडाडून हल्ला केला ते म्हणाले की शासनाकडून शेतकर्‍यांची फसवणूक करण्यात आली आहे. कर्ज माफीची प्रमाणपत्र दिल्या नंतरही ते परत घेण्यात आली. एक लाख कोटी शेतकर्‍यांपैकी केवळ ९६ हजार शंतकर्‍यांना कर्ज मुक्ती प्रमाणपत्र दिले असे मुख्यमंत्री सांगतात परंतु प्रत्यक्षात कोण्याही शेतकर्‍याला कर्जातून मुक्त केलेले नाही. अमरावतीच्या शरद पवारांच्या सर्व पक्षीय कार्यक्रमात खुद मुख्यमंत्र्यानी कर्ज माफीची जाहीर घोषणा केली होती. त्या वेळेस शदर पावर खुद स्टेजवर बसले होते.

हा नेमका काय प्रकार आहे ते नितीन गडकरी व देवेंद्र फडणविस यांनी जाहीर करावे. कारण आमचे सारखे लोक संभ्रमात पडलेले आहे. यावेळी माहिती देतांना म्हणाले की, मालेगांव बॉम्ब स्फोटात असलेला सुधाकर चतुर्वेधी यांनी एटीएस व एन ए आय या तपास अधिकार्‍यांना सांगितले की शदर पवार खुद सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव घेण्यास बाध्य करीत होते.

व पोलिसांवर दबाव टाकत होते असे ते म्हणाले. भाजपाचा प्रत्येक माणूस हा स्वयंसेवक आहे. तर सर संघ चालकांचे मनाप्रमाणेच सरकार चालते. शरद पवारांचे समोर मुख्यमंत्र्यांनी कर्ज माफीची जाहीर घोषणा केली मग कर्ज माफी का देण्यात आली नाही. १२ डिसेंबर ला पवारांचा नागपूर येथे मोर्चा आहे. याला नेमके कोण जबाबदार आहे हे कळले नसल्याने आमचे सारखे लोकांत संभ्रम निर्माण झाला आहे. असेही ते म्हणाले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement