Published On : Wed, Oct 31st, 2018

भंडारा-साकोली विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार राजेश काशीवार यांची आमदारकी रद्द

भंडारा : भंडारा-साकोली विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार राजेश काशीवार यांची आमदारकी रद्द झाली आहे. हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. नागपुर खंडपीठाच्या निकालानंतर भाजप आमदाराचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द झालेय.

पराभूत काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आमदार सेवक वाघाये यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. काशीवार यांनी निवड़णुक लढवितांना शासकीय कंत्राटदार असल्याची माहिती लपविली होती. त्याचा उल्लेख आपल्या तक्रारीत केला होता. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली असता वाघाये यांनी सादर केलेले पुरावे आधारावर नागपूर खंडपीठातील न्यायाधिशांच्या बेंचने आमदार काशीवार यांचे विधानसभेचे सदस्यत्व केले रद्द आहे. त्यामुळे भाजपला हा धक्का मानला जात आहे. मतदारसंघासह भंडारा जिल्ह्यातील भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

भंडारा जिल्ह्यातील साकोलीचे भाजप आमदार राजेश काशीवार यांची आमदारकी रद्द करण्यात आलीय. नागपूर खंडपीठानं काशीवार यांची आमदारकी रद्द केलीय. काशीवार यांनी निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी आणि चुकीची माहिती दिल्याचा ठपका ठेवण्यात आलाय.