Published On : Mon, Sep 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपमध्ये खलबतं; गडकरींच्या निवासस्थानी फडणवीसांसह नेत्यांची बैठक

Advertisement

नागपूर : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच भारतीय जनता पक्षात उमेदवार निश्चित करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील महल येथील निवासस्थानी रविवारी महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह शहरातील भाजपचे प्रमुख नेते आणि आमदार या बैठकीला उपस्थित होते.

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, ६ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. २३ ऑक्टोबरला मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच भाजपमध्ये उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरू झाली आहे.

Gold Rate
Sept 28,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 49,200 /-
Gold 22 KT ₹ 1,38,500 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गडकरींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीसह संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. महायुतीच्या जागावाटपाबाबत मंगळवारी मुंबईत बैठक होणार असून, त्यानंतर उमेदवारांच्या नावांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबरला उमेदवारांची घोषणा होऊन ६ ऑक्टोबरला अर्ज दाखल केले जाण्याची शक्यता आहे.

नागपूर विभागाची पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपसाठी महत्त्वाची मानली जाते. या जागेवर भाजपचा दीर्घकाळ प्रभाव राहिला होता. मात्र, २०२० मध्ये काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव करत ही जागा काँग्रेसकडे खेचून आणली होती. त्यामुळे यंदा ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, काँग्रेसकडूनही विद्यमान जागा कायम राखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

अमरावती विभागाच्या शिक्षक मतदारसंघातून सध्या अपक्ष किरण सरनाईक विधान परिषद सदस्य आहेत. त्यामुळे या जागेच्या निवडणुकीकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.