Published On : Tue, Aug 20th, 2019

कामठीत शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजप-प्रवेश

सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष : पालकमंत्री बावनकुळे

नागपूर: भारतीय जनता पक्ष हा समाजातील सर्व जातीपातीच्या लोकांना एकत्रित घेऊन चालणारा एकमेव पक्ष असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

Gold Rate
11 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,300 /-
Gold 22 KT ₹ 1,01,600 /-
Silver/Kg ₹ 1,25,200/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कामठी येथे राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष उदयसिंग यादव, माजी नगरसवेक श्रावण केळझरकर, युवक काँग्रेसचे महासचिव विजय कोंडुलवार यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी पालकमंत्री बावनकुळे यांच्या कार्यावर विश्वास दाखवत भाजपात प्रवेश घेतला. गज बालाजी मंदिर सभागृहात पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम घेण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते राजेश बांडेबुचे यांच्या नेतृत्वात राकाँ, काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेतला. पालकमंत्री बावनकुळे यांनी पक्षात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांची पक्षाच्या दुपट्टा देऊन स्वागत केले. याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले- हा घराणेशाहीचा पक्ष नाही. समाजातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. भाजपात कोणताही जातीभेद नाही. समाजातील शेवटचा माणसाचा सर्वांगीण विकास हाच एकमेव उद्देश आहे. पक्षात नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या सर्व योजना समजावून घ्याव्यात व समाजातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवून पक्ष संघटन मजबूत करावे असेही ना. बावनकुळे म्हणाले.

या कार्यक्रमाला प्रख्यात उद्योगपती अजय अग्रवाल, माजी नप अध्यक्ष रणजित सफेलकर, प्रा. मनीष वाजपेयी, शहर भाजपाध्यक्ष विवेक मंगतानी, कामठी विधानसभा क्षेत्राचे विस्तारक मनोज चवरे, अनिल निधान, योगेश वाडीभस्मे, अशोक झाडे, श्रीकांत शेंद्रे, नगरसेवक सुषमा सिलाम, लालसिंग यादव, प्रतीक पडोळे, उज्ज्वल रायबोले, पिंकी वैद्य, रमेश वैद्य, संदीप कश्यप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालक कपिल गायधने यांनी केले तर आभार नगरसेवक सुभाष मंगतानी यांनी मानले.

Advertisement
Advertisement