नागपूर: नवीन कामठी परिसरातील प्रत्येक घरी पिण्याया पाण्याचे नळ लागणार असून पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरण्याची गरज राहणार नाही, असे मत राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
नगर परिषद प्रभाग क्रमांक 16 छत्रपतीनगर येथे पट्टेवाटप कार्यक्रमात ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी राष्ट्रीय अल्पसंख्य आयोगाच्या सदस्या अॅड. सुलेखाताई कुंभारे, नगराचध्यक्ष शहाजहा शफाअत, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसिलदार अरविंद हिंगे, नपचे मुख्य अधिकारी रमाकांत डाके, बरिएमंचे अध्यक्ष अजय कदम, शहराध्यक्ष दीपंकर गणवीर, उदास बनसोड, मनोहर गणवीर, नारायण नितनवरे, नगरसेवक प्रतीक पडोळे, सरला शिंगाडे, नीरज लोणारे, लालसिंग यादव, नगरसेवक संध्याताई रायबोले, सुषमा सीलाम, राजेश खंडेलवाल, अॅड. आशिष वंजारी, चंद्रकांत पडोळे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्याचे आमचे काम आहे. या कामांना मी प्राथमिकता देतो. पाणी समस्या सोडविण्यासाठी 27 कोटींचा निधी मंजूर झाला असून नवीन कामठी परिसरातील प्रत्येक घरी लवकरच नळ लागणार आहेत.
कामगारांना पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरांचे स्थायी स्वरुपाचे पट्टे देण्यात आले. लवकरच घरे बांधण्यासाठी 2 लाख 50 हजार रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तसेच नवीन कामठी परिसरात पाच हजार घरे म्हाडाच्या वतीने निर्माण करून देण्यात यणार आहेत. कामगार वर्गातील नागरिकांना पंतप्रधान आयुष्यमान याजनेअंतर्गत आरोग्य सदस्यांची नोंदणी करून घेतली तर त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. अन्न सुरक्षा योजनेत कामगारांनी व नागरिकांनी नोंदणी केली तर त्यांना योग्य भावात सहकारी स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळणार आहे. या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.










