राष्ट्रहिताच्या सरकारसाठ़ी भाजपाच हवी : पालकमंत्री

हिंगणा तालुक्यात पाच गावांमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकी

नागपूर :देशात आणि राज्यात राष्ट्रहिताच्या सरकारसाठ़ी भारतीय जनता पक्षाचेच सरकार आवश्यक आहे. कारण आधी राष्ट्र, नंतर पक्ष व अंतिमत: स्वत: ही भूमिका पक्षाची असून कार्यकर्तेही या भूमिकेनुसारच काम करतात, असे प्रतिपादन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

हिंगणा तालुक्यात डवलामेटी, रायपूर, कान्होलीबारा, टाकळघाट आणि बोथली या पाच गावात भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी आ. समीर मेघे, आनंद कदम, नरेश चरडे, पुरुषोत्तम रागीट, केवटे, श्रीमती रिंके आदी उपस्थित होते. डवलामेटी येथे सुमारे 7 राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

या बैठकींमध्ये बोलताना पालकमंत्री म्हणाले- शेवटी शेतकरी आर्थिक दृष्ट्या मजबूत झाला तरच देश मजबूत होईल. यासाठी शेतकर्‍यांसा़ठी कर्जमाफी, किसान सन्मान योजना, शेतकर्‍यांसाठ़ी पेन्शन योजना केंद्र व राज्य शासनाने आणल्या. एवढेच नव्हे तर 27 हजार कोटी कृषी पंपांची थकबाकी शेतकर्‍यांकडे असताना राज्यातील एकाही शेतकर्‍याच्या कृषीपंपाची वीज कापली गेली नाही. हे एवढ्याच साठी की शेतकरी मजबूत झाला पाहिजे.

गेल्या पाच वर्षात विदर्भातील मंत्र्यांना प्रथमच महत्त्वाची खाती मिळाली. त्यामुळेच अनेक योजना जिल्ह्यात आल्या. मुख्यमंत्री पदासारखे खाते नागपूरला मिळाले. केंद्रीय मंत्री म्हणून नितीन गडकरी नागपूरचेच आहेत. पालकमंत्री पदही मला मिळाले.

त्यामुळे शहर जिल्ह्यासाठ़ी अनेक योजना व एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकला. चंद्रपूरला सुधीर मुनगंटीवार यांना अर्थ व वन यासारखे महत्त्वाचे खाते मिळाले. परिणामी विदर्भाचा अनेक वर्षांचा बॅकलॉग दूर करता आला, असे सांगून पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- ही सर्व किमया फक्त एका योग्य मताची, एका योग्य उमेदवाराची निवड मतदारांनी केल्यामुळे झाली आहे.

कान्होलीबारा येथील बैठकीला जुनघरे, आतीश उमरे, सुवर्णाताई खोबे व अन्य उस्स्थित होते. यावेळीही 75 टक्केपेक्षा अधिक मतदान होईल याची काळजी घेण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.