काँग्रेसच्या काळात एकही योजना आली नाही : किसनजी खुजे

Advertisement

सात गावांमध्ये पालकमंत्र्यांनी साधला जनतेशी संवाद

नागपूर : काँग्रेसच्या काळात कामठी मतदारसंघातील कोराडीच्या लगत असलेल्या लहान लहान गावात एकही योजना जनतेसाठी आली नाही. मात्र पालकमंत्री बावनकुळे झाल्यापासून व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून अनेक योजनांचा लाभ या गावाला मिळाला आहे. गावातील प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या योजनेचा लाभ मिळाला, असे मत बाबुळखेडा येथील नागरिक किसनजी खुजे यांनी व्यक्त केले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपा कार्यकर्त्यांच्या संवाद कार्यक्रमात त्यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे संकेत बावनकुळे, अरविंद खोबे, संजय मैद व अन्य पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. गावाचा विकास करायचा असेल तर योग्य उमेदवाराची निवड करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले- एक मत खूप ताकदवान असते. एका योग्य मतामुळे या जिल्ह्याला 220 कोटींवरून 778 कोटींवर नेऊन बसवले. आता जिल्ह्यासाठी दरवर्षी 778 कोटी रुपये विकासाला मिळणार आहेत. एका मतानेच पंतप्रधान मोदींचे सरकार आले आणि 100 दिवसात काश्मीर भारताशी एकसंध जोडला गेला.

केवळ एका मतानेच राजस्थानमध्ये भाजपाचा उमेदवार पराभूत झाला होता. एवढी शक्ती एका मतात असते. मतदारांचे मन परिवर्तन करा. 75 टक्केपेक्षा जास्त मतदान होईल, यासाठी प्रयत्न करा. सरकार आपलेच येणार आहे आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार आहे, असेही पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.

लोणखैरी येथे सुशीला धुर्वे यांच्या घरी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. गुमथी येथे मनोहरलाल सोलमारे यांच्या घरी, सुरादेवी येथे समीर दूधबर्वे यांच्या, वारेगाव येथे लता गोंडाळे यांच्या निवासस्थानी तर बीना येथे विजय पाटील यांच्या निवासस्थानी, तर बोखारा भाजपाच्या कार्यकर्त्यांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला. या सर्व बैठकांना शंभरावर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते

बॉक्स
बिनाचे आदर्श पुनर्वसन करणार : बावनकुळे
कामठी मतदारसंघातील बिना हे गाव वेकोलिच्या कोळसा खाणीत जाणार आहे. वेकोलिने कोळसा खाणीसाठ़ी हे गाव घेतले असून या गावाचे आदर्श पुनवर्सन येत्या 2 वर्षात करण्यात येणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. वारेगाव आणि भानेगाव येथे जागा असून तेथे या गावाचे पुनर्वसन करण्यात येईल.

दिवाळीनंतर कामाला सुरुवात होणार असून या पुनवर्सनासाठी लागणारा निधी वेकोलि खर्च करणार आहे. विजय पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला शंभरावर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.