Published On : Fri, Sep 27th, 2019

इडी विरोधात माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन

शेकडोंच्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनात नागरिकांची उपस्थिती.

हिंगणघाट:-हिंगणघाट येथे दिनांक 27-9- 2019 ला तहसील कार्यालय हिंगणघाट समोर माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.

सक्तवसुली संचालकाने ई.डी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर खोटा गुन्हा नोंदविला त्यानिमित्त संपूर्ण राज्यात या चुकीच्या धोरणामुळे सर्व कार्यकर्त्यांनी दिनांक 27 सप्टेंबर रोज शुक्रवार ला हिंगणघाट शहरात राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक कांग्रेस तसेच महिला व विद्यार्थी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोध प्रदर्शन करत येथील तहसील कार्यालयासमोर रोष व्यक्त केले व ईडी विरुद्ध घोषणाबाजी करून धरणे आंदोलन करण्यात आले.

राज्य सहकारी बँकेच्या कर्ज वाटप प्रकरणी गैरव्यवहार आवरून बँकेच्या संचालकका सोबत मा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर शुद्ध बुद्धी चे राजकारण करून ई डी ने गुन्हा नोंदविला विधानसभा निवडणुकीची आचार संहिता सुरू असताना “ई.डी” ने गुन्हा नोंदवून जनतेला आश्चर्याचा धक्का दिला.

शरद पवार यांनी “ई.डी” च्या कारवाईला समोर जात स्वागत केले व ई डी कार्यालयाने हजर राहण्यास नकार दिला असला तरी मी स्वतःहून कार्यालयात जाणार व जे काही चौकशी किंवा विचारपूस तुम्हाला करायची आहे ते करा असे आव्हान शरद पवार यांनी केले. कारण पवार यांचा काहीही संबंध नाही तरीसुद्धा त्या बँकेच्या व्यवहाराबाबत गुन्हा दाखल करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम होत आहे.

शरद पवार हे शाहू-फुले-आंबेडकर-छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक असून लोकशाही व्यवस्थेवर निष्ठा ठेवणारे आहेत अशाप्रकारे कोणतेही खोटे गुन्हे दाखल करून जनतेची दिशाभूल करत असाल तरीही महाराष्ट्राची जनता खपवून घेणार नाही असे मत माजी आमदार राजू तिमांडे यांनी धरणे आंदोलन मध्ये व्यक्त केले निवेदन देतेवेळी विधानसभा अध्यक्ष संजय तपासे ,शालीकराव डेहणे, संतोष राव तिमांडे ,बबनराव जगताप, प्रदीप डगवार, सौरभ साळवे, राजू बावणे, अशोक डगवार ,प्रशांत घवघवे, भूषण पिसे, शकील अहमद, विजय बोरकर, सुरेश डांगरी, अशोक आंबटकर, गौरव घोडे ,प्रशांत लोणकर ,भोला निखाडे, गणपत गाडेकर गुणवंत कामडी, बालू खोडनकर, पुंडलिक बकाने, शुभम पिसे , राजु उमरे,दीपक पंधरे ,सचिन तुळणकर ,किरीट शेजपाल, हरिदास तळवेकर, निखिल वादनलवार, राजू भाईमारे, धनपाल डोंगरे,विकास रघाटाटे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते