Published On : Wed, Aug 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी; आता ४० भाजप नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार?

Advertisement

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मनपाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला भाजपच्या तब्बल ४० नगरसेवकांनी दांडी मारल्याने नागपूर महानगरपालिकेतील सत्ताधारी गोटात खळबळ उडाली आहे. या गैरहजेरीवर सत्तापक्ष नेते बाल्या (नरेंद्र) बोरकर यांनी थेट स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांच्याकडे तक्रार करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

नागपूर महानगरपालिका, भगवान महावीर विकलांग सहायता समिती, जयपूर, जिल्हा परिषद आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने १० ऑगस्ट रोजी दिव्यांगांसाठी मोफत सहाय्यक साधनांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणे अपेक्षित असतानाही ४० नगरसेवक गैरहजर राहिले.

Gold Rate
Sept 29,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 47,300 /-
Gold 22 KT ₹ 1,36,5700 /-
Silver/Kg ₹ 2,22,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दिव्यांग नागरिकांना जयपूर फूट, कृत्रिम अवयव आणि विविध सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित या शिबिरात लाभार्थ्यांचे मोजमाप घेण्यात आले. गरजू दिव्यांगांना आवश्यक साधने उपलब्ध करून त्यांना स्वावलंबी करण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.

मात्र, मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रमही गांभीर्याने घेतला जात नसेल, तर पक्षशिस्तीचा धाक नेमका कुठे आहे? असा सवाल या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बाल्या बोरकर यांनी गैरहजर राहिलेल्या ४० नगरसेवकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, या नगरसेवकांना महापालिकेकडून दिला जाणारा निधी रोखण्यात यावा, अशी मागणीच बोरकर यांनी केली आहे. सत्तापक्ष नेत्यांकडून आपल्या पक्षाच्या नगरसेवकांचा निधी रोखण्याची मागणी होणे ही मनपाच्या राजकारणातील मोठी आणि धक्कादायक घडामोड मानली जात आहे.

नगरसेवकांना निधी रोखण्याचा इशारा –

आता स्थायी समिती सभापती शिवानी दाणी या तक्रारीवर काय निर्णय घेतात, संबंधित नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाते का आणि निधी रोखण्याच्या मागणीवर प्रत्यक्षात काय कारवाई होते, याकडे नागपूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी आणि आता निधी रोखण्याची मागणी बाल्या बोरकरांनी ४० नगरसेवकांविरोधात थेट कारवाईचा पवित्रा घेतल्याने भाजपमधील अंतर्गत शिस्तीचा मुद्दा चांगलाच तापला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.