नागपूर : री-नीट यूजी २०२६ परीक्षेच्या तोंडावर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) च्या कारभारातील मोठी त्रुटी समोर आली आहे. नागपूरमधील एका विद्यार्थ्याला महाराष्ट्रातील केंद्राऐवजी थेट संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) अबू धाबी येथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरचा विद्यार्थी अब्दुल्लाह मोहम्मद तालिब याने परीक्षा केंद्रासाठी नागपूर, वर्धा आणि भंडारा हे तीन पर्याय प्राधान्याने निवडले होते. मात्र, प्रवेशपत्र हातात पडताच त्याला धक्का बसला. कारण त्याच्या अॅडमिट कार्डवर परीक्षा केंद्र म्हणून अबू धाबीचे नाव नमूद करण्यात आले होते.
ही बाब लक्षात येताच विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी तातडीने NTA च्या हेल्पलाइनशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. या प्रकाराची दखल घेत NTA अधिकाऱ्यांनी हा प्रकार तांत्रिक बिघाडामुळे (Technical Glitch) घडल्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच पडताळणी पूर्ण झाल्यानंतर योग्य परीक्षा केंद्रासह नवीन प्रवेशपत्र जारी करण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, नीट परीक्षा आधीच पेपरफुटी आणि विविध वादांमुळे चर्चेत असताना ही घटना समोर आली आहे. त्यामुळे परीक्षा व्यवस्थापन आणि NTA च्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, NTA ने सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रातील परीक्षा केंद्र, वैयक्तिक माहिती आणि इतर तपशील काळजीपूर्वक तपासण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही त्रुटी आढळल्यास तातडीने संस्थेशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गौरतलब म्हणजे, री-नीट यूजी २०२६ परीक्षा २१ जून रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत पेन-अँड-पेपर पद्धतीने होणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रासह आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे अनिवार्य राहणार आहे.
स्कॉर्पियो में किडनैप... 7 किलोमीटर दूर ले जाकर थर्ड डिग्री... #nagpurnews #crime...
छात्र मुद्दे पर Youth Congress का प्रदर्शन | 'Amit Shah Jawab Do'...
हर घर तिरंगा अभियान का भव्य आगाज; शहर में वितरित होंगे 1.75...
40 लाख की प्लॉट ठगी का नया केस दर्ज, सक्करदरा पुलिस करेगी...
2009 सीडी मामले में उद्धव ठाकरे का बयान #MaharashtraNews #UddhavThackeray #ShivSena #Political
बिना दस्तावेज मध्य प्रदेश की बस जब्त #MaharashtraNews #STBus #RTO #BusChecking #MPBus...





