Published On : Fri, Nov 15th, 2019

रामटेकच्या मंडईत लोककलावनतानी घडविले लोकक लेचे दर्शन

रामटेक : दरवर्षी रामटेक नगरीत कार्तिक पौर्णिमेच्या शुभ पर्वावर नगर परिषद रामटेकच्या वतीने लोकशाहीर तथा माजी नगराध्यक्ष स्व श्री गुलाबराव टेम्भुरने आणि लोकशाहीर स्व श्री हरीशचंद्र दुनडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आला होता.यात लोककलावनतानी नाटक,दंडार ,तमाशा ,गोंधळ या लोककला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.सहभागी झालेल्या लोककलावनतानी आपल्या नाटके,गोंधळ,दंडार व तमाशा सादर केला.

जो पाहण्यासाठी रामटेककर नागरिक आणि पाहुण्यांनी प्रचंड गर्दी केली होती.यावेळी लोककला सादर केलेल्या अठरा लोककला मंडळाच्या लोककलावनताना रामटेक नगरपालिकेच्या वतीने पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Advertisement

यावेळी , माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी,दिवाणी न्यायाधीश माणिक वाघ,नगराध्यक्ष दिलीप देशमुख,नगर परिषद उपाध्यक्ष शिल्पा रणदिवे, ,पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर ,नगरसेवक प्रभाकर खेडगरकर,अलोक मानकर,नगरसेविका कविता मूलमूले, लता कामडे ,पद्मा ठेंगरे,उज्वला धमगाये,समाजसेविका ज्योती कोलेपरा तसेच मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.”….……दरवर्षी रामटेक नगरीत कार्तिक पौर्णिमेच्या शुभ पर्वावर नगर परिषद रामटेकच्या वतीने

> लोकशाहीर तथा माजी नगराध्यक्ष स्वर्गीय गुलाबराव टेम्भुरने आणि लोकशाहीर स्वर्गीय हरीशचंद्र दुनडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आला होता.ह्यावेळी अलंकार टेंभुरने तसेच लोककलावनतानी नाटक,दंडार ,तमाशा ,गोंधळ या लोककला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.रिपोर्ट सुषमा मर्जीवे रामटेक।

Advertisement
Advertisement
Advertisement