नागपूर – भारतीय कृषी अनुसंधान परिषद राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था आनंद नगर भोपाळ तसेच रोग अन्वेषण विभाग पुणे यांनी नागपूर येथील मोठा ताजबाग या परिसरातील कुक्कुट पक्षांचे नमुने एच 5 एन 1 या एव्हीयन इन्फ्लुएंझा ( बर्ड फ्ल्यू) विषाणूसाठी होकारार्थी आढळून आल्याचे कळविले आहे.
या अनुषंगाने प्राप्त अधिकारान्वये मोठा ताजबाग नागपूर शहर व त्या आसपासच्या एक किलोमीटर त्रिज्येतील परिसर हा बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तसेच बाधित क्षेत्रापासून उर्वरित नऊ किलोमीटर त्रिजेतील परिसर हा निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. बाधित क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्षांची तसेच निगडित खाद्य व अंड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत जलद कृती दलास आदेश देण्यात आले आहे.
एक किलोमीटर त्रिज्येतील बाधित क्षेत्रातील परिसर निर्जंतुकीकरण करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. बाधित क्षेत्रातील कुक्कुट पक्षी अंडी पक्षीखाद्य खरेदी विक्री वाहतूक बाजार व जत्रा तसेच प्रदर्शन आयोजित करण्यास पुढील 21 दिवसापर्यंत प्रतिबंध लावण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश दिले आहेत.