Published On : Fri, Mar 22nd, 2019

भाजपची दुसरी यादी जाहीर, एकच उमेदवार घोषित

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2019) भाजपने काल (21 मार्च) पहिली उमेदवार यादी जाहीर केल्यांतर, त्यापाठोपाठ दुसरी यादीही जाहीर केली. पहिल्या यादीत भाजपने 182 उमेदवारांची घोषणा केली. मात्र, दुसऱ्या यादीचे वैशिष्ट्य असे की, त्यात फक्त एकाच उमेदवाराची घोषणा केली आहे.

भाजपच्या दुसऱ्या यादीत दमण दीव या केंद्रशासित राज्यातील एकमेव उमेदवाराची घोषणा भाजपने केली आहे. दमण दीवमधून भाजपकडून लालूभाई पटेल लढणार आहे.

त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेसाठी भाजपने खास दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. दमण दीव या केंद्रशासित राज्याची निवडणूक लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. म्हणजेच, 23 एप्रिल रोजी दमण दीवमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल आणि निकाल सर्व निकालांसोबतच म्हणजे 23 मे रोजी लागेल.