Published On : Thu, Mar 21st, 2019

भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर, दोन विद्यमान खासदारांचा पत्ता कट, नितीन गडकरी नागपूरमधून

लोकसभा निवडणुकीची पहिली यादी भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे. बुधवारी नवी दिल्लीत आयोजित एका पत्रकार परिषदेत भाजपने 184 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांपैकी 16 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

आज जाहीर झालेल्या यादीनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरमधून, तर संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे धुळे मतदारसंघातून लढणार आहेत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना मतदारसंघातुन लढणार आहे. लातूरमधील विद्यमान खासदार डॉ. सुनील गायकवाड आणि नगरमधून विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. लातूरमधून सुधाकर शृंगारे यांना तर नगर मधून डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आज जाहीर करण्यात आलेली महाराष्ट्रमधील 16 नावे आणि मतदारसंघ

नंदुरबार – हिना गावित
धुळे – सुभाष भांमरे
रावेर – रक्षा खडसे
अकोला – संजय धोत्रे
वर्धा – रामदास तडस
नागपूर- नितिन गडकरी
गडचिरोली – अशोक नेते
चंद्रपूर – हंसराज अहिर
जालना – रावसाहेब दानवे
भिवंडी – कपील पाटील
मुंबई नॉर्थ – गोपाल शेट्टी
मुंबई नॉर्थ सेंट्रल – पुनम महाजन
नगर- डॉ. सुजय विखे-पाटील
बीड- डॉ. प्रितम मुंडे
लातूर – सुधाकर शृंगारे
सांगली – संजय पाटील