Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, May 22nd, 2018

  जैवविविधतेचे संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी

  Biodiversity conservation is the responsibility of every citizen

  नागपूर: निसर्गातील प्रत्येक वस्तू एकमेकांवर अवलंबून आहे. ही साखळी तुटली तर निसर्गाचा समतोल बिघडेल. बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव आपल्या जीवनावर पडला आहे. त्यामुळे जैवविविधतेकडे आपण कमालीचे दुर्लक्ष करीत आहोत. ह्या नैसर्गिक संपदेचे जतन हे आपले कर्तव्य आहे. जैवविविधतचे संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे उद्‌गार महापौर नंदा जिचकार यांनी काढले.

  जागतिक जैवविविधता दिवसाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेतील जैवविविधता समितीने स्थानिक सातपुडा वनस्पती उद्यान येथे नगरसेवकांच्या दौऱ्याचे आयोजन केले होते. या दौऱ्यादरम्यान संवाद साधनाता महापौर नंदा जिचकार बोलत होत्या.

  यावेळी जैवविविधता समितीच्या अध्यक्षा दिव्या धुरडे, सदस्य निशांत गांधी, धंतोली झोनच्या सभापती विशाखा बांते, हनुमाननगर झोनच्या सभापती रूपाली ठाकूर, ज्येष्ठ नगरसेविका रूपा राय, चेतना टांक, मंगला खेकरे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्याविभागाचे प्रमुख डॉ. रमाकांत गजभिये, सातपुडा वनस्पती उद्यानाचे प्रभारी अधिकारी डॉ. व्ही. यू. राऊत, वरिष्ठ संशोधन सहायक संजीव परहाटे, तेलंगखेडी उद्यानाचे पी. एन. भुते यांची उपस्थिती होती.

  महापौर नंदा जिचकार व अन्य सदस्यांनी यावेळी ६५ एकर इतक्या मोठ्या परिसरात पसरलेल्या उद्यानातील विविध ठिकाणांना भेट दिली. आमराईतील विविध प्रजातींची झाडे, हर्बल गार्डनमधील शतावरी, अनंतमूळ, गवती चहा, हड्डीजोड वनस्पती, अमलतास, सिट्रोनिला, काळी हळद, अमृतवेल, लेंडीपिवळी आदी औषधी वनस्पती, विविध प्रकारच्या तुळशी, ग्रीन हाऊस मधील वनस्पतींबद्दल सविस्तर माहिती घेतली. या सर्व वनस्पतींच्या उपयोगाबाबत प्रा. रमाकांत गजभिये यांनी माहिती दिली.


  सातपुडा वनस्पती उद्यान म्हणजे नागपूरकरांसाठी ठेवा आहे. ह्याचे जतन झाले पाहिजे. विविध शाळांतील विद्यार्थ्यांना येथे आणून या सर्व वनस्पतींबद्दल माहिती दिल्यास भावी पिढीला या नैसर्गिक संपत्तीचे महत्त्व पटेल, त्याचे जतन करण्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होईल, असे महापौर नंदा जिचकार यावेळी बोलताना म्हणाल्या. जैवविविधता समितीच्या माध्यमातून येथे महानगरपालिकेतील संपूर्ण पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल. या वनस्पतींबद्दल आणि उद्यानातील जैवविविधतेबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याचा आपला प्रयत्न राहील, असा जैवविविधता समितीच्या अध्यक्ष दिव्या धुरडे यांनी सांगितले. महाराजबाग येथील नर्सरीत अशा प्रकारच्या वनस्पती उपलब्ध असल्याची माहिती डॉ. रमाकांत गजभिये यांनी दिली. तेलंगखेडी उद्यानातही अशाच वनस्पती असून त्या उद्यानाचे सौंदर्यीकरण करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145