Published On : Wed, Apr 22nd, 2020

यावेळी पाणीबिल ऑनलाईन बघा आणि ऑनलाईनच भरा.

Advertisement

ग्राहकांना SMS अपडेटसाठी मोबाईल क्रमांक नोंदविण्याचेही आवाहन

नागपूर: कोरोना उद्रेकामुळे संपूर्ण जग घरात बसले असल्याने नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी नागरिकांना आपले पाण्याचे देयक ‘ई-बिल’ स्वरुपात ऑनलाईन बघण्याचे आवाहन केले आहे. पाणी बिल एसएमएस अपडेट स्वरुपात मोबाईलवर देखील उपलब्ध होतील.

छपाईच्या सुविधा लॉकडाऊनमुळे उपलब्ध नसल्याने मनपा-OCW यांनी नागरिकांना इलेक्ट्रोनिक स्वरुपात तेसेच एसेमेस अपडेट्सच्या माध्यमातून या त्रैमासिकाची पाणीदेयके देण्याचे ठरविले आहे. सर्वच नागरिकांना सरासरी देयके देण्यात आलेली आहेत मात्र त्यासाठी नागरिकांना www.ocwindia.com/vb या संकेतस्थळावरील “Consumer Corner” या पानावर जाऊन स्वत:ला नोंदवावे लागेल.

नागपूर शहर प्रशासन, नागपूर पोलीस व मनपा यांच्या सहकार्याने OCW ने गर्दी टाळण्याच्या उद्देशाने आपली देयक स्वीकृती केंद्रे बंद ठेवली आहेत आणि यापूर्वीच नागरिकांना पेटीएएम, ऑनलाईन बिल पोर्टल यासारख्या डिजिटल सुविधांचा वापर करून देयके भरण्याचे आवाहन केले आहे. यामागे नागरीका तसेच कर्मचाऱ्यांची सुरक्षा हा उद्देश आहे.

पाणी ग्राहकांना त्यांचे ‘ई-बिल’ ऑनलाईन बघण्याचे व भरण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून झोन कार्यालयांमध्ये सहसा