Published On : Tue, Feb 25th, 2020

नागपुरात अनावश्यक फीदरवाढी विरोधात बाईक रॅली

नागपूर : जागरूक पालक परिषदेच्या नेतृत्वात व पालक संघटनेद्वारे अनावश्यक फी दरवाढीच्या विरोधात बाईक रॅली काढण्यात आली होती. लोकमत चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. सुरूवातीला शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांना निवेदन देण्यात आले.

त्यानंतर रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचली. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी पालकांनी निवेदनाच्या माध्यमातून समस्या मांडल्या. नियमबाह्य फी वाढविणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली. जिल्हाधिकारी ठाकरे यांनी पालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

या शिष्टमंडळात जागरूक पालक परिषदेचे अध्यक्ष गिरीश पांडे, पालक संघटनेचे बबिता सिंह शर्मा, सपन कुमार, महेश वेले, स्वरेशा दमके, अमोल फाये, अमित होशिंग, अर्चना देशपांडे, रूपेश तावडे, प्रवीण कांबळे, अर्चना मैंद, वैशाली पिसार, शिवानी वाघ, प्रांजली कुंभारे आदी उपस्थित होते.