Published On : Mon, Jun 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या भांडेवाडीत एमडी ड्रग्सचा मोठा पर्दाफाश; 9 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

Advertisement

नागपूर -शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात क्राइम ब्रँचच्या एनडीपीएस पथकाने मोठी कारवाई करत भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोघांना अटक केली आहे. या कारवाईत 52 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स, तीन मोबाईल फोन, एक दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण 9.04 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, संघर्ष नगर परिसरात अमली पदार्थांची खरेदी-विक्री होणार असल्याची गुप्त माहिती क्राइम ब्रँचच्या एनडीपीएस पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. यावेळी विजय नंदलाल रहांगडाले (वय 43, रा. संघर्ष नगर) आणि शहबाज फिरोज शाह (रा. महेश नगर, गिट्टीखदान) यांना ताब्यात घेण्यात आले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत आरोपींकडून 52 ग्रॅम एमडी ड्रग्स आढळून आले. याशिवाय तीन मोबाईल फोन, एक मोपेड आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.

तपासादरम्यान अटक करण्यात आलेला विजय रहांगडाले हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात खून, दरोडा, लूटमार, चोरी यांसह विविध गंभीर स्वरूपाचे 15 गुन्हे दाखल आहेत. तसेच एनडीपीएस कायद्यांतर्गतही त्याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement

प्राथमिक तपासात विजयने एका फरार आरोपीकडून एमडी ड्रग्स खरेदी केल्याचे, तर शहबाज हा ते ड्रग्स खरेदी करण्यासाठी आला असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आणखी एका आरोपीचा सहभाग समोर आला असून त्याचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 22(क) आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नागपूरमध्ये एमडी ड्रग्सचे जाळे कोणाच्या माध्यमातून कार्यरत आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली असून ड्रग्सविरोधातील विशेष मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

आश्रमशाला में 21 छात्राओं से छेड़छाड़ का आरोप #POCSOCase #MaharashtraNews #Ashramshala #CrimeNews

आश्रमशाला में 21 छात्राओं से छेड़छाड़ का आरोप #POCSOCase #MaharashtraNews #Ashramshala #CrimeNews

कोंढाली में फार्म हाउस धू-धूकर जला, 40 मिनट में खाक! #NagpurNews #Chandanpardi #FireNews #News

कोंढाली में फार्म हाउस धू-धूकर जला, 40 मिनट में खाक! #NagpurNews #Chandanpardi...

Instagram पर दोस्ती, शादी का झांसा... युवती 7 महीने की गर्भवती! #NagpurNews  #Instagram #Crime #News

Instagram पर दोस्ती, शादी का झांसा... युवती 7 महीने की गर्भवती! #NagpurNews...

पिता से विवाद, बेटे ने पत्थर से फोड़ा सिर! #NagpurNews #Crime #FamilyDispute #MaharashtraNews

पिता से विवाद, बेटे ने पत्थर से फोड़ा सिर! #NagpurNews #Crime #FamilyDispute...

Nagpur शराब के पैसों को लेकर भाई ने भाई की चाकू से हत्या! #NagpurNews #Crime #MurderCase #News

Nagpur शराब के पैसों को लेकर भाई ने भाई की चाकू से...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges