Published On : Mon, Jun 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

विधान परिषद रणधुमाळीत भाजपचा मोठा डाव; नगरसेवकांना गोवा दौऱ्यावर पाठवण्याची तयारी!

Advertisement

नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्यासाठी विशेष नियोजन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षाच्या नगरसेवकांसाठी गोवा दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून, मतदान होईपर्यंत त्यांच्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची नजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक १० जून रोजी नागपुरातून मुंबईकडे रवाना होतील. त्यानंतर ११ जूनला विमानाने गोव्यात जाणार असून तेथे काही दिवस मुक्काम करणार आहेत. या काळात संघटनात्मक बैठका, प्रशिक्षण, पर्यटन तसेच परस्पर संवादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

१८ जून रोजी होणाऱ्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून डॉ. राजीव पोतदार तर काँग्रेसकडून अतुल लोंढे रिंगणात आहेत. निवडणुकीत कोणताही धोका पत्करायचा नसल्याने भाजपने नगरसेवकांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.

गोवा दौऱ्यानंतर सर्व नगरसेवक मुंबईत परतणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर रामभाऊ प्रबोधिनी येथे होणाऱ्या प्रशिक्षण शिबिरातही त्यांचा सहभाग राहणार आहे.

Advertisement

नगरसेवकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विभागनिहाय गट तयार करण्यात येणार असून प्रत्येक गटावर पक्ष पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असेल. महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांना मात्र या दौऱ्यातून वगळण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, भाजप हा कार्यक्रम संघटन बळकटीकरण आणि प्रशिक्षणाचा भाग असल्याचे सांगत असली तरी विरोधक आणि राजकीय विश्लेषक याकडे ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ म्हणून पाहत आहेत. त्यामुळे १८ जूनच्या मतदानात या रणनीतीचा किती परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
पिता से विवाद, बेटे ने पत्थर से फोड़ा सिर! #NagpurNews #Crime #FamilyDispute #MaharashtraNews

पिता से विवाद, बेटे ने पत्थर से फोड़ा सिर! #NagpurNews #Crime #FamilyDispute...

Nagpur शराब के पैसों को लेकर भाई ने भाई की चाकू से हत्या! #NagpurNews #Crime #MurderCase #News

Nagpur शराब के पैसों को लेकर भाई ने भाई की चाकू से...

16 साल की नाबालिग को शादी का झांसा देकर यौन शोषण का आरोप.. #NagpurNews #POCSOCase #Crime #News

16 साल की नाबालिग को शादी का झांसा देकर यौन शोषण का...

Jalgaon में नकली देशी शराब की फैक्ट्री का भंडाफोड़!#FakeLiquor #MaharashtraNews #Excise #CrimeNews

Jalgaon में नकली देशी शराब की फैक्ट्री का भंडाफोड़!#FakeLiquor #MaharashtraNews #Excise #CrimeNews

Nagpur Crime: 14 साल की बेटी के कथित यौन शोषण का आरोप #NagpurNews #POCSOCase #NagpurCrime #News

Nagpur Crime: 14 साल की बेटी के कथित यौन शोषण का आरोप...

एनआईटी कार्यालय में महिला कर्मचारी से छेड़छाड़ का आरोप

एनआईटी कार्यालय में महिला कर्मचारी से छेड़छाड़ का आरोप

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges