
नागपूर : कोराडी परिसरात घरफोडीची मोठी घटना उघडकीस आली असून चोरट्यांनी एका बंद घरातून तब्बल ३ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरी करून पसार होत असताना स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोन अल्पवयीन आरोपींना पकडण्यात यश आले. मात्र त्यांचे दोन साथीदार चोरीचा माल घेऊन फरार झाले आहेत. फरार होताना आरोपींनी नागरिकांना चाकूचा धाक दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्मृतीनगर येथे राहणारे मोईन जलील खान हे कुटुंबासह नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
चोरी करून आरोपी घराबाहेर पडत असताना परिसरातील नागरिकांना त्यांच्यावर संशय आला. नागरिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी चाकू दाखवत धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी धाडस दाखवत दोन अल्पवयीन आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, त्यांचे दोन साथीदार चोरीचा माल घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले.
या प्रकरणी कोराडी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींविरुद्ध चोरी तसेच भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. फरार आरोपींचा आणि चोरीच्या मालाचा शोध सुरू असून पोलिस विविध ठिकाणी तपास करत आहेत.
दरम्यान, पकडलेले आरोपी अल्पवयीन असल्याने कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
स्थानिकांच्या सतर्कतेमुळे दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले असले तरी चोरीचा मुद्देमाल आणि फरार आरोपी अद्याप हाती लागलेले नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान कायम आहे.
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews
उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...




