अमरावती : अचलपूर-परतवाडा परिसरात समोर आलेल्या अत्यंत गंभीर ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक शोषण प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अल्पवयीन मुलींशी मैत्री करून त्यांचे व्हिडिओ काढणे आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Featured Products
या प्रकरणात आतापर्यंत अनेक आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास यंत्रणा अधिक तीव्र करण्यात आली आहे. अयान अहमद याच्यासह इतर संशयितांची चौकशी सुरू आहे. पोलिसांकडून मोबाईल फोन, संपर्क तपशील आणि डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्या घरावर प्रशासनाने बुलडोझर कारवाई करत मोठी कारवाई केली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने व्हावा यासाठी विशेष पोलीस पथक कार्यरत करण्यात आले असून अधिक आरोपींचा शोध सुरू आहे. पीडित कुटुंबे पुढे येत असल्याने तपासाला नवी दिशा मिळत आहे.
या घटनेवर राजकीय स्तरावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे. आमदार रवी राणा यांनी अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत, समाजात भीती निर्माण करणाऱ्या कृत्यांना आळा बसावा अशी भूमिका मांडली आहे.









