Published On : Thu, May 29th, 2025
By Nagpur Today Nagpur News

हुडकेश्वर पोलिसांची मोठी कामगिरी – मानसिक विकसन केंद्र चालवणाऱ्या विजय घायवटवर लैंगिक अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल

Advertisement

नागपूर | हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने मानसिक आरोग्य सल्लागार विजय प्रभाकर घायवट याच्यावर बलात्कार, लैंगिक शोषण व बालकांच्या सुरक्षेसंदर्भातील गंभीर आरोपांखाली एकूण चार गुन्हे दाखल करून अटक केली आहे.

प्रकरणाचा तपशील

2014 मध्ये एका पीडित महिलेने मनोविकास माइंड डेव्हलपमेंट सेंटर, मानेवाडा, नागपूर येथे काउन्सेलिंगसाठी प्रवेश घेतला. तिथे उपचाराच्या नावाखाली आरोपी विजय घायवट याने तिच्यावर अश्लील वर्तन केले. त्यानंतर मद्य देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि या प्रकाराचे फोटो व व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रीत केले.

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार झाल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अप.क्र. 831/2024 दाखल करण्यात आला.

Gold Rate
28 July 2025
Gold 24 KT 98,500 /-
Gold 22 KT 91,600 /-
Silver/Kg 1,13,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अन्य पीडितांच्या तक्रारीनंतर नोंदवलेले गुन्हे

तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईलमध्ये इतरही मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ सापडले. त्यामुळे खालीलप्रमाणे आणखी गुन्हे दाखल झाले आहेत:

  • अप.क्र. 870/2024: भादंवि 376, 109, 420, POCSO आणि बाल न्याय कायद्यानुसार
  • अप.क्र. 04/25: BNS व SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार
  • अप.क्र. 36/25: भादंवि 376, 377, 109, 506, 34

सहआरोपी महिला अटकेत

या गुन्ह्यांत आरोपीला सहकार्य करणाऱ्या मृणाल विजय घायवट (पत्नी) व पल्लवी किशोर बेलखोडे (सहकारी) या दोघी महिलांनाही अटक करण्यात आली आहे. त्या दोघी 6 महिन्यांपासून फरार होत्या. दि. 28 मे 2025 रोजी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असून 31 मे 2025 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर झाली आहे.

विशेष तपास पथकाची स्थापना

या गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केली. खालील अधिकाऱ्यांनी यशस्वी तपास केला:

  • पोउपनि रामटेके – अप.क्र. 831/24 व 870/24
  • स.पो.आ. विनायक कोते व नरेंद्र हिवरे – अप.क्र. 04/25
  • पोउपनि नरेश साखरकर – अप.क्र. 36/25

पोलिसांचे आवाहन

या घटनेत इतरही पीडित असण्याची शक्यता असून, सहायक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांनी अन्य पीडितांनी पुढे येऊन तक्रार द्यावी असे आवाहन केले आहे.

कार्यप्रदर्शनाबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कौतुक

या संपूर्ण कारवाईसाठी पुढील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले:

  • मा. डॉ. रविंद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नागपूर शहर
  • मा. नवीनचंद्र रेड्डी, सह पोलीस आयुक्त
  • मा. शिवाजी राठोड, अप्पर पोलीस आयुक्त (दक्षिण प्रभाग)
  • मा. रश्मिता राव, पोलीस उपायुक्त (परिमंडळ 4)

मार्गदर्शक वरिष्ठांच्या नेतृत्वाखाली हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पो.नि. ज्ञानेश्वर भेदोडकर, पोउपनि पपीन रामटेके आणि पोउपनि नरेश साखरकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

 

Advertisement
Advertisement