Published On : Tue, Jun 26th, 2018

दाहाचाकी ट्रकची मोटार सायकल ला धडक

Advertisement

कन्हान : नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील जे एन दवाखाना जवळ दाहाचाकी ट्रकची मोटार सायकल धडक दिल्याने मागे बसलेल्या कु मंगला बोरसरे चा रस्त्यावर पडुन घटनास्थळीच मुत्यु झाला .

आज मंगळवार ( दि २६) सायंकाळी ६ वाजता दरम्यान मनसर टेकाडी कडुन नागपुर कडे महिंद्रा सेंटुरो मोटार सायकल क्र एम एच ४९- पी -१७५७ ने जात असताना मागुन टेकाडी कडुन कन्हान कडे जाणाऱ्या दाहाचाकी ट्रक क्र एम एच ४९-ए के -५५४५ च्या चालकांनी आपले वाहन निष्काळजीने बेधडकपणे चालवुन मोटार सायकला धडक मारल्याने मोटार सायकल चालक बंशी पाठक वय ३५ वर्ष मु जुनी मंगळवारी नागपुर हा डावीकडे व मागे बसलेली कु मंगला दौलतराव बोरसरे वय २६ वर्ष मु उमरेड ही उजव्या बाजुला ट्रक कडे सिमेंट

Gold Rate
23 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,57,800/-
Gold 22 KT ₹ 1,46,800/-
Silver/Kg ₹ 3,29,800 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रस्त्यावर खाली पडल्याने डोक्याला जबर मार लागुन मोठय़ा प्रमाणात रक्त स्ताव झाल्याने तिचा घटनास्थळीच मुत्यु झाला . तर बंशी पाठक ला किरकोळ जखमी झाला .

घटनास्थळावरून ट्रक चालक पसार झाला. अपघाताची माहीती मिळताच कन्हान थानेदार चंद्रकांत काळे आपल्या पोलीस ताफ्यासह पोहचुन युवतीचा मुत्यु देह कामठी उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदना करिता त्वरित रवाना करून दाहाचाकी ट्रक ताब्यात घेतला . असुन अञात ट्रक चालका विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement