Published On : Mon, Jul 26th, 2021

ठवरे कॉलनी येथील भूमिगत लघुदाब वाहिनीच्या कामाचे भूमिपूजन

नागपूर : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातील ठवरे कॉलनी तसेच बाळाभाऊ पेठ परिसरातील भूमिगत लघुदाब वाहिनीच्या कामाचे भूमिपूजन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याहस्ते करण्यात आले. यामुळे वीज ग्राहकांना अधिक शाश्वत व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे.

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते ठवरे कॉलनी येथील ३ स्पनच्या उपरी लघुदाब वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाचे व बाळाभाऊ पेठ येथील रोहित्र स्थानांतरण कामाचे भूमिपूजन आज सोमवारी २६ जुलैला करण्यात आले. या प्रसंगी नागपूर शहर मंडलचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे,सिव्हिल लाइन्स विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, गिरीधर सोरते,प्रशांत टेंभेकर अतिरिक्त कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समिती अंतर्गत उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात ऊर्जा विभागाची ८ कोटी ७३ लाखाची कामे करण्यात येत असून यात नवीन रोहित्रांची स्थापना,एरिअल बंच केबलिंग,स्थापित रोहित्रांची क्षमता वाढविणे,अपघातप्रवण उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांचे स्थलांतरन व उपरी वाहिन्या भूमिगत करणे तसेच समाजातील विशेष घटक योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वीज जोडणी देणे अशा स्वरूपांच्या कामांचा समावेश आहे.